पाटोदा:आठवडा विशेष टीम―मराठा सेवा संघ प्रणित वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद या विद्यार्थ्यांच्या मुलभूत हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी बीड जिल्ह्याचे सुपुत्र प्रखड वक्ते शिवचरित्रकार प्रा.संदीप कदम सर यांची निवड करण्यात आली.यावेळी प्रदेशाध्यक्ष मा.भास्कर निर्मळ साहेब, मराठा सेवा संघाचे जगदीश देसले, विशाल कुरकुटे,अमित केरकर, साईनाथ बोबें,पाटील साहेब, कांंबळे साहेब आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोण आहेत शिवचरित्रकार संदीप कदम सर..?
पाटोदा तालुक्यातील सौंदाना या खेडेगावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा,विद्यार्थी दशेतच वक्तृत्वाच्या जोरावर आपल्या व्यक्तिमत्वाची जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर छाप पाडली व त्या माध्यमातून पुढे छत्रपती शाहू, फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन महामानवांच्या जीवनचरित्रावर परिपूर्ण अभ्यास करून आज राज्यभर शिवजयंती, शंभुजयंती,भीमजयंती, अहिल्यबाई होळकर, व अन्य महामानवांच्या जयंती उत्सवाच्या निमित्त शिव शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा समाजासमोर ठेऊन समाजाची विचारधारा बदलण्याचे काम संदीप कदम यांच्या माध्यमातून सुरू आहे.
पाटोदा तालुका हा मुळात ऊसतोड मजुरांचा तालुका आहे, जिल्ह्यातील तरुण पिढी अन्य मार्गाला न जाता, चांगल्या दर्जाचे शिक्षण व चांगल्या शिक्षणातून शासकीय अधिकारी व चांगल्या दर्जाचे उद्योजक झाले पाहिजेत म्हणून त्यांनी पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही या गावी जिजाऊ संशोधन व अभ्यास केंद्र सुरू केले आहे,या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक वेगळी प्रेरणा देण्याचे काम कदम यांच्या माध्यमातून सुरू आहे.
याच बरोबर शभुराज्याभिषेक सोहळा, गड संवर्धनासाठी वेगवेगळ्या मोहीम हाती घेऊन छत्रपती शिवरायांचे गडकोट जिवंत ठेवण्याचे व त्यांचे विचार तुमच्या आमच्या मनात रुजविण्याचे कार्य संदीप कदम यांच्या माध्यमातून सुरू आहे, त्यांची ही निवड नक्कीच मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड यांना बळ देणारी व बीड जिल्ह्यासह राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देणारी असेल असे मत जनतेमधून येत आहे.त्यांचा निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या जात आहेत.