पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―जनआशीर्वाद दौऱ्याची सुरुवात आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून करण्यात आली. याप्रसंगी जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची पाळमुळं रोवण्यासाठी व वाढविण्यासाठी रात्रंदिवस आपल्या जीवाचे रान करणाऱ्या स्थानिक ज्येष्ठ शिवसैनिकांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून जन आशीर्वाद दौऱ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. याप्रसंगी मोठ्या संख्येने जमलेल्या पाचोऱ्यातील जनसागराला नतमस्तक होत युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाचोराकरांचे आभार मानले तसेच हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनवण्याकरिता तुमचा आशीर्वाद असाच सदैव माझ्या पाठीशी राहू दे अशी विनंती केली.
यावेळी खासदार संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे,खासदार गजानन किर्तिकर, पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन,विजय शिंदे नगरसेवक मुंबई, आ.किशोर आप्पा पाटील शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना सचिव वरूण सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.