अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
मागील 41 वर्षांपासुन सुरू असलेली परंपरा कायम राखत यावर्षी ही अंबाजोगाई येथील सर्व ब्राह्मण संघटना एकत्र येवून येथील रघुपती मंगल कार्यालयात शुक्रवार,दिनांक 3 एप्रिल 2020 रोजी सामुदायिक व्रतबंधाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती उल्हास पांडे यांनी दिली आहे.
या बाबत शहरातील कृष्णा हॉस्पीटल येथे झालेल्या बैठकीत ब्राह्मण सभेचे अध्यक्ष संजय लोणीकर,पेशवा महिला संघटनच्या अध्यक्षा सौ. कल्याणीताई मकरंद कुलकर्णी, योगेश्वरी वधु-वर मंडळाचे प्रभाकरराव शेलमुकर,पुरोहित संघाचे अध्यक्ष गजाननराव कुलकर्णी,पेशवा युवा संघटनचे अध्यक्ष श्रीकांत जोशी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.या बाबत मार्गदर्शन करताना महेश अकोलकर यांनी वाढत्या महागाईच्या काळात अनाठायी खर्च टाळण्यासाठी सामुदायिक कार्याचे महत्व पटवून दिले.तर ब्राह्मण सभेचे अध्यक्ष संजय लोणीकर यांनी मौंजीकरीता केवळ नाममात्र शुल्क घेत आहोत.तरी सर्वांनी सामुदायिक मौंजीतच आपल्या मुलांच्या मौंजी कराव्यात असे आवाहन केले.सामुदायिक मौंजीच्या यशस्वितेसाठी अनिरूद्ध चौसाळकर,राहुल कुलकर्णी, सतीष देशपांडे हे परिश्रम घेत आहेत.तर सुधाकर विडेकर आणि बाबुराव बाभुळगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सामुदायिक मौंजी सोहळा होणार आहे.बैठकीचे सुत्रसंचालन सौ.प्रतिक्षा जोशी यांनी करून उपस्थितांचे आभार संकेत तोरंबेकर यांनी मानले.