Offer

दलित शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या माध्यप्रदेश पोलिसांवर कठोर कारवाई करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 19:आठवडा विशेष टीम― मध्यप्रदेश मधील गुणा शहराजवळ शेती करणाऱ्या दलित शेतकऱ्याला तो कसत असलेली जमीन खाली करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकऱ्यांनी कारवाई करून पोलिसांनी दलित शेतकरी राजकुमार अहिरवार यांस बेदम मारहाण केली. त्या प्रकरणाचा रिपब्लिकन पक्षातर्फ़े तीव्र निषेध करून या दलित शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तसेच जिल्हा प्रशासनाच्या जबाबदार अधिकऱ्यांवर निलंबनाची कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. या प्रकरणी ना रामदास आठवले यांनी मध्यप्रदेश चे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ( डीजीपी) यांच्या शी संपर्क साधून या प्रकरणी जबाबदार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी ना रामदास आठवले यांनी केली.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या राज्य सरकार ने या प्रकरणी जबाबदार जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांची बदली केली आहे मात्र केवळ बदली न करता जबाबदार अधिकऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.
राजकुमार अहिरवार या दलित शेतकऱ्याने कसलेल्या जमिनीचा ताबा सोडण्याची तयारी दाखविताना आलेले पीक काढून घेतल्यानंतर जमीन खाली करून देण्याची विनवणी केली मात्र प्रशासनाच्या मुजोर अधिकाऱ्यांनी गरीब दलित शेतकऱ्याची विनंती धुडकावून लावून त्यास जबर मारहाण केली. या अपमानाने व्यथित झलेल्या शेतकरी दाम्पत्याने पोलीस आणि प्रशासनाच्या अन्यायाच्या निषेधार्थ विष प्राशन केले. राजकुमार अहिरवार आणि त्यांची पत्नी रेखा अहिरवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती आपणास मध्यप्रदेश चे डिजीपिंनी दिली असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button