सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― गणेशोत्सव काळात औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून आॅनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून याबाबत सोयगाव पोलिसांनी या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
स्पर्धांमध्ये आजपासून सुरु होणार्या गणगौरी सजावट स्पर्धेत सामाजिक संदेश,रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा यामध्ये मुलगा-मुलगी एक समान,कोरोना योद्ध,आॅनलाईन शिक्षण झाले सोपे,नृत्य स्पर्धा,आदि विविध आॅनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे.यामध्ये स्पर्धकांनी सहभागी होण्यासाठी स्पर्धेचा प्रकार,नाव ,गाव,आदी उल्लेख करून सोयगाव पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मोबाईल क्रमांकावर-९९२२५९२७४८ आणि पोलीस नाईक विकास लोखंडे-८८०५०००६५८ या क्रमांकावर सहभागाचा उल्लेख पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे.