बीड (नानासाहेब डिडूळ): आज रविवार रोजी सकाळी पाटोदा येथील मांजरसुंभा रोङ वरील बामदळ वस्ती जवळ स्विफ्ट डिजायर क्रमांक एम.एच.१२के.एन ९७६१ व आयशर टेम्पो क्रमांक एम.एच.२६ बी.ई.५९४५ चा भिषण अपघात झाला या अपघातात आयशर टेम्पो खाली स्विफ्ट अडकलेली असुन गाडीमधील लहान मुलासह एकुण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भिषण होता की अपघात ठिकाणी रक्ता मासाचा सदा पडला होता क्रेन च्या साहाय्याने आयशर टेम्पो खाली अडकलेली स्विफ्ट गाङी काढण्यात आली
हे कुटुंब केज तालुक्यातील जिवाची वाङी येथे पुणे येथुन लग्नासाठी जात असताना हा अपघात झाला अपघात एवढा मोठा होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.
घटना घडतात पाटोदा येथील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस हे घटनास्थळी हजर झाले व मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली व मृतदेह शासकीय रुग्णालय पाटोदा येथे नेण्यात आले.
संपादक
राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जयंती निमित्त पाटोद्यात ३ दिवस उपक्रम ; विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा होणार सन्मान
पाटोदा: राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जयंतीनिमित्त पाटोद्यात सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध धार्मिक व समाज उपयोगी कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सन्मान सोहळा विविध स्पर्धा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तीन दिवस हा सोहळा चालणार आहे.या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हान देखील करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पाटोदा शहरात राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी देखील सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये 11 ऑगस्ट रोजी पशु व संवर्धन आयुक्त डॉ सागर डोईफोडे जम्मू-काश्मीर सेंद्रिय शेती तज्ञ सत्यजित हंगे व रेल्वे मंत्रालय दिल्लीचे सल्लागार धनराज गुट्टे यांचे सकाळी 11 ते 2 या वेळेत व्याख्यान होणार आहे राष्ट्रसंत भगवान बाबा गौरव पुरस्कार सोहळ्याचेही आयोजन याप्रसंगी करण्यात आले आहे.यंदाचे पुरस्कार सहारा अनाथालयाची संचालक संतोष गर्जे,प्रीती गर्जे,पसायदान प्रकल्पाचे गोवर्धन दराडे,पत्रकार सुरेश जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे.यासोबत 12 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता खुल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी सात ते नऊ च्या दरम्यान गायक सुभाष शेप यांच्या भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या प्रतिमेची पाटोदा शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक सकाळी 11 ते दुपारी दोनच्या दरम्यान निघणार आहे. तसेच सकाळी 11 ते 5 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे संध्याकाळी पाच ते सात या वेळेत निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. या जयंती उत्सव सोहळ्यात आयोजित सर्व कार्यक्रमा साठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
■ सन्मान कर्तुत्वाचा!
राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती उत्सव सोहळ्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तुत्वान असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे,यामध्ये पद्मश्री सय्यद शब्बीर,गोसेवक निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर,महंत राधाताई महाराज आईसाहेब,इन्फंट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे व सेंद्रिय शेती तज्ञ सत्यजित हंगे आदी मान्यवरांना सन्मानित केले जाणार आहे.
■ जयंती उत्सवाचे ठिकाण व आयोजक!
राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राष्ट्रसंत भगवान बाबा सार्वजनिक जयंती उत्सव समिती पाटोदा यांनी विविध उपक्रमाचा आयोजन करत असते यावेळी देखील सामाजिक उपक्रमातून जयंती साजरी करण्याचा निर्णय आयोजकांनी केला असून यावर्षी नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात तीन दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमातून मोठ्या उत्साहात जयंती साजरी होणार आहे.
राष्ट्रध्वज नागरिकांसाठी पोस्ट कार्यालयातही उपलब्ध- पोस्टमास्तर सुरेश बनसोडे
आमदारांची जनमानसातील प्रतिमा मलीन करणाऱ्यांना मंत्रिमंडळातून डच्चू शहाजीबापू पाटीलांना त्यांचेच वक्तव्य भोवले-हेमंत पाटील
मुंबई:आठवडा विशेष टीम― ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सर्व कसे ओक्के मध्ये आहे,’ असे वक्तव्य करीत जनमानसात राज्यातील लोकप्रतिनिधितींची अप्रत्यक्षरित्या प्रतिमा मलीन करणाऱ्या सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. मतदार संघातील जनतेला वाऱ्यावर सोडून राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान गुवाहाटीत सुट्टीचा आनंद घेत असतांना त्यांची ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. त्यांचेच व्यक्तव्य त्यांना भोवले आहे, असे हेमंत पाटील म्हणाले.
शहाजी बापू यांची ऑडियो क्लिप तुफान व्हायरल झाली.अगदी कमी वेळेत राज्य तसेच देशभरातील लोकांच्या मोबाईल पर्यंत ते पोहचले. लोक त्यांना ओळखू लागले. ते या व्हायरल क्लिपमुळे प्रसिद्ध तर झाले मात्र त्यांची किंमत संपली.अशाच किंमत संपलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा निर्णयाचे स्वागत करतो,अशी भावना हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.
सत्ताकारणात आमदार केवळ घोडेबाजार करीत सरकार उलथून टाकण्यासाठी कुठल्याही स्तरावर जावू शकतात. मोठ्या हॉटेलमध्ये राहतात, खुप पैसा खर्च करतात, निर्सगरम्य ठिकाणी फिरतात असे चित्र शहाजी बापू यांच्या व्हायरल क्लिपवरून सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर उभे राहते. सत्तासंघर्षादरम्यान आमदारांना निवडून देणाऱ्या मतदारांना त्यांचा विसर पडतो. मौजमज्जा करण्यासाठी लोकप्रतिनिधी कुठे ही, कुठल्याही स्तराला जावू शकतात, असा संभ्रम आणखी बळकट होण्यासाठी शहाजी बापूंच्या क्लिपमुळे भर पडली. त्यामुळे अशा आमदारांचा सर्वात अगोदर राजीनामा घेतला पाहिजे. किमान असे नेतृत्व नसल्याने जनमानसातील लोकप्रतिनिधींची प्रतिमा सुधारण्यात मदत होईल,असे हेमंत पाटील म्हणाले.
शिक्षणविस्तार अधिकारी श्रीमती.सीमा टकले-काळे यांना उच्च न्यायालयाचा अतरीमं दिलासा
बीड:नानासाहेब डिडुळ― जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून आष्टी येथे कार्यरत असणाऱ्या श्रीमती सीमा खंडू टकले काळे यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पदनावती करण्याची कारवाई केली होती. श्रीमती. टकले या विस्ताराधिकारी म्हणून आठ वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांची मूळ नियुक्ती मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार झालेली आहे . त्यांच्या नियुक्ती बाबतचे प्रकरण हे अपर आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे सुरू होते. अप्पर आयुक्तनी टकले यांचे कोणतेही म्हणणे न ऐकता कोणत्याही कागदपत्राची शहानीशा न करता एकतर्फी निर्णय दिला होता. त्या विरोधात टकले यांनी राज्य सरकारकडे दाद मागितली होती. सदर प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच जिल्हा परिषदेने कारवाई केली . त्याविरुद्ध श्रीमती टकले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयातील सुनावणीच्या दरम्यान युक्तिवाद झाला यामध्ये श्रीमती टकले यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले की श्रीमती टकले यांची विस्ताराधिकारी पदावर आठ वर्षे सेवा झालेली आहे. तसेच त्यांनी विस्तार अधिकारी पदाची विभागीय परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे. त्यांना विस्तार अधिकारी पदावर कायम केलेले असून त्यांचे सेवा जेष्ठता यादी मध्ये पाच वर्षापासून नाव समाविष्ट आहे. विस्तार अधिकारी पदाचे विभागीय प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. वास्तविक श्रीमती टकले यांची मूळ नियुक्ती ही वेळोवेळी दिलेले आदेश हे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये नियुक्ती दिलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा रिव्हर्स करण्याचा अधिकार नसल्याचा पुरावा सादर करण्यात आला त्यानुसार जिल्हा परिषद यांना कुठलीही कारवाई करता येणार नसल्याचे निदर्शनास आणून दिले. वरील सर्व बाबी पाहता असे निदर्शनास आले की श्रीमती टकले यांनी विस्तार अधिकारी पदाबाबतच्या सर्व पात्रता पूर्ण केलेल्या आहेत सर्व बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन माननीय न्यायालयाने श्रीमती टकले यांच्या नियुक्तीच्या कारवाईस अंतरिम स्थगिती दिली आहे. श्रीमती टकले यांच्या वतीने अँड महेश भोसले वअन्य विधीतज्ञांनी काम पाहिले. सीमा टकले ह्या सुरेश काळे यांच्या पत्नी आहेत
जरंडीला सारे काही ! कुठेच जाण्याची गरज नाही..जिल्ह्य तील एकमेव स्वयंपूर्ण जरंडी गाव – पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांचे भावोद्गार
सोयगाव,दि.०५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― अबब! जरंडीला सारेच काही,कुठेच जाण्याची गरज नाही…असे उदगार सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी शुक्रवारी दि.०६ जरंडी ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांना भेटी दिल्या त्यावेळी ते जरंडी गावावर खुश होत बहोत खूब असे म्हणून त्यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले आहे.
जरंडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात विक्रमी वृक्षलागवड मोहीम,जेष्ठ नागरिकांचा कक्ष,गावाच्या सुरक्षेसाठी गावात सी.सी.टी.व्ही कॅमेरे,आदी उपक्रम राबवून गावाचा कायापालट केला यासाठी सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी जरंडी ग्राम पंचायतीला भेट देवून गावाच्या सुरक्षेसाठी व पोलिसांच्या मदतीसाठी राबविण्यात आलेल्या गावभर सी.सी.टी.व्ही कॅमेरा उपक्रमाचे कौतुक केले आहे,गावाच्या प्रत्येक कोपरा या कॅमेऱ्यात कैद झालेला असून रात्रीचा फायदा घेत काही अज्ञातांना या उपक्रमाचा धसका बसला असल्याचे सांगून जरंडी गाव सोयगाव पोलिसांचे पोलीस मित्र झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सरपंच वंदनाताई पाटील,राजेंद्र पाटील,माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे,ग्राम पंचायत सदस्य मधुकर पाटील,ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे,उपनिरीक्षक सतीश पंडित,पोलीस शिपाई रवींद्र तायडे,लिपिक संतोष पाटील,बालू तात्या,सिद्धार्थ मोरे,श्रीराम चौधरी,विजय चौधरी,आदींची उपस्थिती होती.
हर घर तिरंगा साठी धनगरजवळका गावात जि.प.प्राथमिक शाळेची प्रभात फेरी
पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथील जि.प .शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव च्या निमित्ताने 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट ला हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा ) चे फलक घेऊन जि.प.प्राथमिक शाळा धनगरजवळका येथील 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव भर प्रभात फेरी काढून गावकऱ्यांना 13 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा फडकविण्यासाठी
सदैव राखु तिरंग्याचा मान जगात आपली वाढेल शान …
भारतमातेचे गीत गाऊ तिरंगा घरोघरी लाऊ
अशा घोषणाही देण्यात आल्या यावेळी जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पंढरीनाथ सोंङगे ,सुनिल जाधव , विजय सरगर यांनी मोठे परीश्रम घेऊन गावभर प्रभात फेरी काढली यावेळी विद्याथ्यान मध्ये आनंदाचे वातावरण दिसुन आले.
१६६ कोटी रूपयांचा ठीगळांचा राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी मांजरसुंभा- चुंभळी; टोल सुरू करण्यापुर्वीच रस्ताकामाचे लोखंडी गज उघडे पडले आंदोलनाचा ईशारा देताच खड्डे बुजवले- डाॅ.गणेश ढवळे
बीड: जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्ग ५४८ -डी चुंबळी ते अहमदपुर राष्ट्रीय महामार्ग एकुण १७० किलोमीटर असुन अंदाजित किंमत ८७९ कोटी रूपये असुन कामाचा कालावधी पुर्ण होऊन सुद्धा २ वर्षापासून रखडलेले असुन चुंबळी ते मांजरसुंबा १६६ कोटी रूपयांचा ३३ किलोमीटरचा निकृष्ट रस्ता जागोजागी ठीगळांचा बनला असुन निकृष्ट कामामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असुन राष्ट्रीय महामार्ग मृत्युमार्ग बनला असुन संबधित प्रकरणात वारंवार लेखी निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा प्रशासकीय आधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळेच संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी तसेच पुर्ण काम झाल्याशिवाय टोल आकारणी सुरू करण्यात येऊ नये असे लिखित निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्य अभियंता म.रा.र.वि.म तसेच अधिक्षक अभियंता औरंगाबाद यांना दिले आहे.
राष्ट्रीय महामार्ग नव्हे मृत्युमार्ग ;२ वर्षात ४० पेक्षा जास्त बळी
_____
काम पुर्ण झालेले नसुन निकृष्ट रस्तेकाम,चढ उतार तसेच दुभाजक तसेच गतिरोधक नसणे आदि गोष्टीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे मुळुकवाडी जवळील एकाचवेळी ३ शेतक-यांचा अपघाती मृत्यु, विकास सुंदर वैरागे,प्रकाश तुकाराम जाधव,आदित्य भावठाणकर,अजिंक्य धस,महेंद्र घुगे,काशीबाई थोरात ,चंद्रकला घुले,शेषेराव जाधव आदिसह ४० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेलेला आहे. याविषयी वारंवार निवेदन देऊन सुद्धा आधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असुन संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी.
टोल सुरू करण्यापुर्वीच गज उघडे तर जागोजागी भेगा पडलेल्या
___
चुंबळी ते मांजरसुंबा रस्ताकाम हुले कन्स्ट्रक्शन पाटोदा यांच्यामार्फत करण्यात येत असून टोल नाका आकारण्याच्या तयारीत असुन निकृष्ट रस्त्याप्रकरणात गुणनियंत्रक विभागामार्फत तपासणी तसेच काम पुर्ण झाल्याशिवाय टोल आकारण्यात येऊ नये अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर व भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष पाटोदा हमीदखान पठाण यांनी जिल्हापप्रशासनाला दिला आहे.
आंदोलनाचा ईशारा देताच खड्डे बुजले; :-डाॅ.गणेश ढवळे
_______
काल दि.१८ सोमवार रोजी लेखी तक्रार जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अभियंता म.रा र.वि.(मर्या )औरंगाबाद यांना तक्रार देऊन रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर आज दि.१९ जुलै मंगळवार रोजी संबधित ठेकेदार आधिका-यांनी खड्डे बुजवून घेतले आहेत. परंतु पावसाळ्यात हे बुजवलेले खड्डे पुन्हा पडणार असुन पुन्हा लोखंडी गज उघडे पडतील.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२
वाळू माफियाकडून पत्रकारावर हल्ला; पोलिसात गुन्हा दाखल
सोयगाव,दि.१७: अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यां ढम्पर चा फोटो व व्हिडीओ शूटिंग केल्याचा संशय घेत एका दैनिकाच्या पत्रकारवर वाळू माफियाकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पत्रकार जखमी झाला असून, पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वर गजमल इंगळे असे पत्रकार यांचे नाव असून, अमोल हिरे असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ईश्वर गजमल … Read more
थेट जनतेच्या मनातील सरपंच निवडीचा कायदा शिंदे – फडणवीस सरकारने पुन्हा करावा- सरपच सेवा संघाची मागणी
मुंबई: संपुर्ण महाराष्ट्रात सरपंच सेवा संघ राज्यभर कार्यरत आहे सरपंच हा गांवचा प्रथम नागरिक आहे सरपंचांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सरपंच अहोरात्र प्रयत्न करत असतो गावातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सरपंच थेट सरपंच म्हणून निवडून आला तर आदर्श गावे निर्माण होण्यासाठी वेळ लागणार नाही.पुवी फडणवीस सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया सुरू केली होती यामुळे महाराष्ट्रात 12 हजारापेक्षा जास्त सरपंच लोकनियुक्त आहे हा निर्णय थेट जनतेतून सरपंच निवड जोर धरू लागली आहे शिंदे – फडणवीस सरकारने घेतला तर भविष्यात ग्रामीण भागाचा कायापालट होण्यासाठी वेळ लागणार नाही मध्यंतरी महा विकास आघाडी सरकारच्या काळात थेट सरपंच निवडीचा कायदा रद्द केला आहे यामुळे सर्व सामान्य माणसाच्या मनातील सरपंच निवड होऊ शकली नाही यामुळे ग्रामीण भागात घोडे बाजार मोठ्या प्रमाणात झाला यामुळे सरपंच यांना काम करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत तरी ग्रामपंचायती वर सरपंच निवड प्रक्रिया थेट जनतेतून व्हावी अशी मागणी सरपंच सेवा संघाच्या वतीने सरपंच संघटित चळवळीचे प्रणेते बाबासाहेब पावसे पाटील संगमनेर तसेच प्रदेशाध्यक्ष रोहीत पवार यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे या मागणीसाठी महाराष्ट्रातुन ग्रामपंचायती चे ठरवा एकत्रित करून निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे यावर लवकरच निर्णय घ्यावा अशी विनंती अमोल शेवाळे रविंद्र पावसे रविंद्र पवार सोमनाथ हरिश्चद्रे दत्तात्रय डुकरे निलेशकुमार पावसे जयकुमार माने सौ वंदना पोटे सविता गवारे जयश्री मारणे शोभा बल्लाळ सुजाता कासार सविता पावसे यांच्या सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
शेत मजुरावर रानडुक्कराचा हल्ला ;घोसला येथील घटना
घोसला,दि.०७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― घोसला ता.सोयगाव येथे शेतात पिकांना खते देण्याचे काम करतांना अचानक रानडुक्करने शेतात प्रवेश करून शेतात काम करणाऱ्या मजुरावर हल्ला चढविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली या घटनेत शेतमजूर गंभीर जखमी झाल्याने त्याचेवर प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी जळगावला पाठविण्यात आले आहे.
चंद्रकांत एकनाथ बावस्कर(वय ४७) असे रानडुक्करच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेत मजुराचे नाव असून शेतात पिकांना खते देण्याचे काम करत असतांना अचानक शेतात आलेल्या चवताळलेल्या रान डुक्कराने त्याचेवर हल्ला चढवून त्यास चावा घेवून गंभीर जखमी केले आहे.या घटनेमुळे घोसला शिवारात शेत मजुरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून ऐन खरिपाच्या मशागतीच्या कामांमध्ये खीळ बसली आहे.शेती शिवारात रान डुक्कराचे कळप मोठ्या प्रमाणावर आहे त्यांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.
बीड: डोंमरी येथील युवकाने काही दिवसासाठी ‘मुख्यमंत्री’ बनवा अशी राज्यपालांकडे केली मागणी
बीड: नानासाहेब ङिङूळ― सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलटापालट झाली असून प्रत्येक पक्ष हा स्वतःची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसापासून आपापसात चर्चा सुरू आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आसून इतर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. यामुळे संतप्त झालेल्या डोंमरीतील मा.महेश भोंडवे यांनी थेट राज्यपाल साहेबांकडे मला काही दिवसासाठी मुख्यमंत्री करा अशी पत्राद्वारे मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या खूप मोठा बदल झाला आहे. सर्व पक्षाचे लक्ष्य आपली सत्ता स्थापन करण्यासाठी जे ते नेते आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याकडे व जनतेकडे कोणत्याही पक्षाचे अथवा कोणत्याही नेत्याचे लक्ष राहिले नाही. परंतु माननीय महोदय सध्या महाराष्ट्रात. विशेषत: मराठवाड्यात मान्सूनच खूप उशिरा आगमन झाल्यामुळे माझा सर्व शेतकरी वर्ग चिंतेत आहे. तसेच महाराष्ट्रातील धरून बेरोजगार वर्गाला २०१९ पासून कोणतीही स्पर्धा परीक्षेची जाहिरात निघाली नाही. आणि ज्या जाहिराती निघाल्या त्याच्या परीक्षा योग्य झाल्या नाहीत. जो तो पक्ष आणि जो ते नेते सत्ता स्थापन करण्याच्या नादात माझ्या शेतकरी बंधू कडे आणि बेरोजगार तरुणाकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे भविष्यात माझ्या शेतकरी बंधू च्या आत्महत्या रोखण्यासाठी माननीय मेहरबान राज्यपाल साहेबांनी मला जोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता स्थापन होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कराव. अशी मागणी पाटोदा तालुक्यातील डोमरी गावच्या मा. महेश भोंडवे यांनी राज्यपाल साहेबांकडे मागणी केली आहे.
वीर निखिल कांकरिया च्या वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
पाटोदा:आठवडा विशेष टीम― दिनांक ५ जून रोजी पाटोदा येथील प्रतिष्ठित व्यापारी कांकरिया क्लास सेंटरचे मालक निखिल कांकरिया यांनी त्यांचा मुलगा वीर च्या वाढदिवसानिमित्त गरजू गरीब वंचित मसनजोगी वस्तीवरील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला .यावेळी शाळेच्या शिक्षिका सुरेखाताई खेडकर यांचा देखील वाढदिवस संयुक्त केक कापून सर्व विद्यार्थी च्या उत्साही वातावरणात साजरा केला यावेळी निखिल कांकरिया यांनी माणुसकीची भिंतीला ११०० रुपये मदत केली . यावेळी ३०विद्यार्थ्यांना वही ,पेन, कंपास शैक्षणिक साहित्य देण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन माणुसकीची भिंत यांनी केले होते. यावेळी उपस्थित युवा नेते युवराज जाधव ,त्रिमूर्ती मंडप चे मालक पप्पू शेठ जाधव , हजारे, आकाश ,अजय शिरवटे ,सरपंच व माणुसकीची भिंतचे दत्ता देशमाने, रामदास भाकरे उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी सर्व बालगोपाळांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तहसिलदार गणेश जाधव एसीबीच्या जाळ्यात
निलंगा: निलंगा तालुक्यात अवैध वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तरी देखील त्यावर कारवाई करण्याऐवजी ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे तेच वाळु माफियांशी हातमिळवणी करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बिनबोभाट कुठलीही कारवाई न करता अवैध वाळू वाहतुकीला परवानगी हवी असेल तर तीन लाख दे, अशी मागणी करणाऱ्या व ती लाच स्वीकारणाऱ्या निलंगा येथील तहसिलदारास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
तीन ट्रकमधून वाळूची वाहतूक करण्यासाठी व कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी एका व्यक्तीकडे प्रति ट्रक तीस हजारांची मागणी तहसिलदार गणेश जाधव यांनी केली होती. त्यानूसार मागील तीन महिन्याचे एकूण एक लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर तडजोडी अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. तहसीलदार गणेश जाधव यांच्या घरासमोर स्वतः गणेश दिगंबरराव जाधव आणि खाजगी व्यक्ती रमेश गुंडेराव मोगरगे यांना ही रक्कम स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
तक्रारदाराकडून वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर या पुढे कारवाई न करण्यासाठी प्रती ट्रक ३० हजार या प्रमाणे दोन ट्रकचे ६० हजार महिना या प्रमाणे तीन महिन्याचे १ लाख ८० हजार रुपये तहसिलदार जाधव यानी मध्यस्थामार्फत मागितले होते. तडजोडीनंतर दीड लाखाची रक्कम एजंट रमेश मोगेरगे यांचे कडे देण्यास सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे आज रोजी रमेश मोगेरगे याने निलंगा येथे तहसीलदार जाधव यांच्या घरासमोरच लाचेची रक्कम दीड लाख रुपये पंचासमक्ष घेतली.
दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तात्काळ दोन्ही आरोपींना पकडले. या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नदीत अवैध वाळू उपशासाठी बोटींचा सर्रास वापर चालु आहे.
पाटोदा येथे नायब तहसिलदार पदी असता वेळी सेतु चालकांच्या गळ्यातील ताईत झाले होते गणेश जाधव.
मतपत्रिका चोरी प्रकरण ; दोन दिवसात संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास निवडणूक अधिकार्याला काळे फासू – धनराज गुट्टे
संबंधित अधिकारी यांना बडतर्फ करण्याची मागणी
वागळे:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्य फार्मसी काँन्सिलच्या सिन्नर येथे निवडणूकी दरम्यान मतपत्रिका चोरी प्रकाराची निवडणूक अधिकारी यांना संपूर्ण माहिती असताना सामान्य मतदार आणि उमेदवार यांना मतदान प्रक्रियेच्या पारदर्शिकतेबद्दल संशय निर्माण झालेला असून मतपत्रिका आपल्या कार्यालयातून निघून जवळपास दहा दिवस झाले असताना देखील त्या संबंधित मतदारापर्यंत पोचलेल्या नाहीत. या अशा प्रक्रियेमुळे मतदान पद्धतीविषयी निर्माण झालेला संशय खात्रीत बदलतो कि काय ?
यासंदर्भात निवडणूक अधिकारी यांचेकडून उमेदवार किंवा मतदारांनी विचारलेल्या शंकांची उत्तरे न मिळणे, आलेल्या मोबाईल कॉल्सना सिद्ध न करणे वा स्वीकारणे या सर्व गोष्टी ह्या वरील प्रक्रियेला पूरक आहेत कि काय ? असे संभ्रम निवडणूक अधिकारी यांचे या कृतीमुळे सिद्ध होत आहेत. निवडणूक अधिकारी यांची भूमिका संदिग्ध वाटत आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी यांनी मतदान प्रक्रियेबद्दल एक सविस्तर खुलासा निष्पक्ष व वेळेत द्यावा अन्यथा या निवडणुकीला स्थगिती मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही सामान्य मतदारांकडून झाल्यास नवल वाटायला नको. निवडणूक अधिकारी यांचेकडून तीन दिवसा नंतरही या प्रकाराबद्दल कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सोमवारच्या आत संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास सर्व फार्मासिस्ट निवडणुक अधिकारी यांचे भोंगळ कारभारा बाबत आंदोलन छेडू व त्यांचे तोंडाला काळे फासू. या नंतर होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील असा इशारा भारतीय जनता पार्टीचे जनरल सचिव धनराज विक्रम गुट्टे यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते व राज्यपाल यांचेकडे संबंधित अधिकारी यांना बडतर्फ करण्याची मागणी देखील केली आहे.
Mahapolice : Maharashtra Police Bharti 2022: Apply 18,331 पोलीस भरती Online Form – mahapolice.gov.in
As per information from sources, Maharashtra Police Department is going to recruit 6888 vacancies of police constables in first week of October month of 2022 ( 5 October 2022).Application form for Police bharti 2022 soon will be available on MahaITexam portal from IT cell of Maharashtra Government.Notification and recruitment related information will be available on Mahapolice official website.For around 12528 police constable (shipai) vacancies [2019 Year Vacancies] ,Bharti will start approximately on March 2023.