औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजराष्ट्रीयविशेष बातमी

औरंगाबादच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी ५० कोटींचा निधी मंजूर

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― देशाचे माजी केंद्रीय कॅबिनेट ग्रामविकास मंत्री लोकनेते दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी ५० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.सिडको मार्फत या स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे.बुधवारी नगरविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढला आहे.
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी काही महिन्यांपुर्वी पत्र पाठविले होते. त्यानुसार सिडकोला ५० कोटी ६१ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

तर, या लोकनेत्यांच्या स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी औरंगाबाद महापालिकेकडे असणार आहे. त्यामुळे स्मारकाच्या उभारणीनंतर सिडकोने सदर स्मारक औरंगाबाद महानगरपालीकेकडे सोपवायचे आहे.

विशेष म्हणजे,स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्मारकाचे काम ३ जून च्या आधी नाही सुरू झाल्यास जय भगवान महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी राज्यभर मुंडेंभक्त आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button