पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘महारेल’च्या वतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण मुंबई दि. 4: ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. ‘कोरोना’चे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन … Read more

संभाजी ब्रिगेडच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील परिचारिकांची विविध मागण्यासाठी काळी फिती लावुन निर्देशने

पुणे:आठवडा विशेष टीम― आज महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेड च्चा आवाहानाला प्रतिसात देत परिचारिकांच्चा विविध मागण्यासाठी काळी फिती लावुन आपले महाराष्ट्र शासनाने लक्ष वेधले पाहिजे यासाठी राज्यभर निर्देशने करण्यात आली आहेत. यामध्ये कुठेही परिचारिका ला काळीमा फासनार नाही आसे कुठलेही कृत्य केले नाही आपले सर्व प्रश्न शांततेच्चा मार्गाने मांडण्याचा प्रत्यत्न केला आहे
तसेच महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांनी संभांजी ब्रिगेड या संघटनेचे आभार ही मानले. असून राज्यातील सर्व परिचारिकांनी काळ्या फिती लावून सोशल डिस्टन्सींग नियमांचे पालन करत निदर्षने करण्यात आली आहेत.

राज्यातील नर्सेस चा आवाज राज्य सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र व युनायटेड नर्सेस असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली अनोखे ब्लॅक फ्रायडे आंदोलन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न झाले. आज इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रीय संस्कृती जपत महाराष्ट्रातील सर्व नर्सिंग ऑफिसर वर्ग एकत्र येऊन शांत-बध पद्धतीने काम चालू ठेऊन महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले. हे आंदोलन शांत-बध पद्धतीचे होते, कोरोना रोगाची महामारी बरोबरच अन्य रुग्ण सेवा ही कुठली ही निष्काळजी न करता चालूच होती. आज पण स्वतः च्या हक्काची लढाई असताना पण काम चालू ठेऊन आपला धर्म, आपले कर्तव्य पार पाडत, होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठाऊन तोंडाला काळया फती (ब्लाक रिबीन ) लाऊन आपली नैराश्य, आपल्या सोबत होणारी पिळवणूक, हक्का साठी एकत्र येऊन नर्सिंग व्यासायाईकांनी राज्यव्यापी आंदोलन केले. राज्यातील सर्व नर्सेस ने आज शुक्रवार ०५ जून रोजी तोंडाला लावलेल्या आपल्या मास्कला काळ्या फिती लावून फोटो सोशल मीडियावर अपलोड करून शासनाचा राज्यव्यापी निषेध केला. त्या आंदोलनाला महाराष्ट्रातील सर्वत्र नर्सेस नि कसलेही निष्काळजी न करता , काम बंद करू शकले असते परंतु तस न करता रुग्ण सेवा सुरू ठेवली, कोणालाही विरोध न करता संभाजी ब्रिगेड च्या हाकेला धावून उत्कृष्ट प्रतिसाद दिला , त्याच बरोबर युनायटेड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी ही पाठिंबा दर्शवला त्या साठी सर्वांचे आभार. राज्यात भरमसाठ नर्सेस बेरोजगार असताना २३/०५/२०२० ला वैद्यकीय शिक्षण संशोधन व संचनालाय मुंबई यांनी केरळहुन डॉक्टर्स व नर्सेस ची मागणी केल्याच पत्र केरळ आरोग्य मंत्र्याना दिले या अनुषंगाने राज्यात विविध संघटनानी लॉकडाऊन काळात विविध मार्गाने सरकारला सोशल मीडिया मार्फत विरोध करत राज्यातील नर्सेस ने प्रयत्न केला परंतु राज्य सरकार ने राज्यातील सर्व नर्सेसकडे दुर्लक्ष केले.यावरून आता नर्सेस च्या हक्कासाठी,नर्सेस ला न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेड आता मैदानात उतरली आहे.

तरी आज ५ जून ला राज्यातील सर्व नर्सेस ने आपला प्रचंड सहभाग नोंदऊन राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा राज्यव्यापी निषेध नोंदवला आहे .
राज्यसरकार ने असे करून पण लक्ष दिले नाही तर संभाजी ब्रिगेड राज्यातील नर्सेस साठी रस्त्यावर उतरेल व यास सरकार जबाबदार राहील असा तीव्र इशारा संभाजी ब्रिगेड ने दिला आहे. देशभरात कोरोना या आजाराचे महाभयंकर संकट असताना राज्यातील सर्व उच्च शिक्षित नर्सेस तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत व सध्या काही रुग्णालये बंद असल्या कारणाने बऱ्याच नर्सेसवर उपास मारीची वेळ आली आहे तरी राज्य सरकार हे नर्सेस कडे दुर्लक्ष करत वर त्यांच्या वरती अन्याय करत आहे.
यासाठी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष मनोजदादा आखरे, सचिव सौरभ दादा खेडेकर व नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ स्वप्नील इंगळे, शहराध्यक्ष प्रफुल वाघ, सचिव नितीन रोठे पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष अजय मराठे यांनी पाठिंबा दिला. तसेच याला युनायटेड नर्सेस असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष जिबिन टी सी, नेबु मॅथ्यू, मुंबई रिजनचे मिलिंद मोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजय मराठे, अमरावतीचे सुजाता पवार, रिजन कंगे, मीनाक्षी मेश्राम, यवतमाळ मधील कृणाल मालकापुरे , लातूर मधून सुकेश गायकवाड,शरद केंद्रे, युगांतर गिते, व आदी बनसोडे,रणवीर राजपूत,संग्राम सोनगेकर,शुभम पंचांगे,अरुण आवळे, प्रतीक आवळे,नाशिक चे गोकुळ शेळके, विशाल जगताप,अविनाश पवार, हेमंत पवार, संदीप मोरे,निखिल केदार, किशन ढोली,अश्विनी कदम, स्नेहल तायडे,सोनाली घोडके बीड मधुन भक्तराम फड. व इतर सहकारी यांनी केलेल्या कामगिरी बद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानले आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आरोग्य तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी घेतला पुणे जिल्ह्याचा आढावा

पुणे:आठवडा विशेष टीम― महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला. पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रनिहाय कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच आरोग्य तपासणीबाबत तातडीने सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, तसेच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी केल्या आहेत.
महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी पुणे शहरासोबतच पुणे विभागातील कोरोना प्रतिबंधाबाबतचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव करीर म्हणाले, पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते. या आजारांची आणि कोविड १९ ची लक्षणे सारखी असल्याने जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. महागनरपालिका आणि शासनाची रुग्णालये ही कोविड १९ साठी रुग्णालये म्हणून राखून ठेवण्यात आलेली असल्याने पावसाळ्यातील आजारासंदर्भात खाजगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्त्वाची असून पावसाळ्याच्या काळात रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोरोनासाठी निर्माण करण्यात आलेल्या तीन स्तरावरील रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता निर्माण करण्यावर भर देण्याचे निर्देशही करीर यांनी दिले. यासोबतच स्त्राव तपासणी क्षमता, दिवसनिहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या, सुलभ नियोजनासाठी मायक्रो कंन्टेनमेंट झोन, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, जेष्ठ नागरिकांची तपासणी, शाळा सुरू करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी तसेच सुरू झाल्यानंतरची काळजी, उपचार सुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच सर्व मिळून कोरोनाचे हे संकट निश्चितपणे दूर करू, असा विश्वासही श्री.करीर यांनी व्यक्त केला.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी पुणे शहरासह पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय तयार होणाऱ्या नवीन हॉटस्पॉटवर देखील लक्ष देण्यात येत आहे. परराज्य व परजिल्ह्यातून प्रवास करुन आलेल्या तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व श्वसनाशी संबंधित आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह असणारे नागरिक, गरोदर महिला, लहान बालके यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यात कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत असल्याचे सांगून पुणे शहरासह विभागात सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी सर्व आघाड्यांवर प्रशासन प्रयत्नशील आहे. पावसाळ्याच्या कालावधीत कोरोना संसर्गाबरोबरच अन्य आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये, यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. झोपडपट्टी व प्रतिबंधित क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कोरोनाबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

फेसबुक मेसेंजर हॅक झाल्यानंतरही डॉक्टर अशोक लोढा यांच्या सतर्कतेमुळे अनेकांची फसवणूक टळली

परळी वैजनाथ दि.२३:आठवडा विशेष टीम― सध्या व्हाट्सअप , फेसबुक, एटीएम यासारख्या साधनांचा वापर करून ही खाती हॅक करुन लोकांची फसवणूक करण्याचे अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत. अशाच एका प्रकाराला परळीच्या डॉक्टर अशोक लोढा यांनाही सामोरे जावे लागले, मात्र त्यांनी तातडीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्यांच्या अनेक मित्र परिवाराचा फसवणूक होण्याचा धोका टळला आहे.

याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की परळी येथील सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर अशोक लोढा यांचे फेसबुक वर इतरांसारखे खाते आहे . या फेसबूक ला जोडूनच येणारे मेसेंजर ही त्यांच्या मोबाईल मध्ये असले तरी वेळेअभावी ते कधीच फेसबुक मेसेंजर चा वापर फारसा करत नाहीत.

याचाच गैरफायदा घेत पुणे येथील समीर खन्ना नामक एका व्यक्तीने त्यांचे हे मेसेंजर खाते हॅक केले आणि त्यांच्या यांच्या मित्र यादीतील अनेक मित्रांना मला आता तातडीने दहा हजार रुपयांची आवश्यकता आहे ते पैसे गुगल पे ,फोन पेजने पाठविण्याची विनंती केली.

अचानक डॉक्टरांचा मेसेज आल्यामुळे त्यांना खरोखरच पैशाची आवश्यकता असेल असे समजून अनेकांनी या खन्ना नावाच्या नावाच्या व्यक्तीने दिलेल्या नंबरवर पैसे पाठवण्याची तयारी केली होती .

मात्र पद्मावती भागातील नगरसेवक विजय भोईटे , प्रशांत जोशी यांनाही अशा प्रकारचा मेसेज गेला असता त्यांना त्याबद्दल शंका आल्याने त्यांनी तातडीने डॉक्टर लोढा यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला त्यावर तातडीने डॉक्टर लोढा यांनी आपल्या मित्र यादीतील सर्व मित्रांना माझे अकाऊंट हॅक झाले असून आपल्याकडे कोणी पैशाची मागणी केल्यास ती देऊ नये असे कळल्याने एकाही व्यक्तीने त्या व्यक्तीला पैसे दिले नाहीत.

लोढा यांनी मोबाइल क्रमांकावरून त्या व्यक्तीचा संपूर्ण नाव गावाचे नाव ही माहिती काढून काल संभाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत सायबर गुन्ह्याची तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री पवार हे करत आहेत.

दरम्यान नागरिकांनी आपल्या सोशल मीडियावरील खात्याची काळजी घ्यावी, वारंवार आपला पासवर्ड बदलत राहावा तसेच अशा प्रकारचे मेसेज आल्यानंतर त्यावर लगेच विश्वास न ठेवता खात्री करूनच पैशाचे व्यवहार करावेत असे आवाहन या घटनेत सजगता दाखवणाऱ्या डॉक्टर लोढा यांनी केले आहे.

परळीचे भूमिपुत्र अनिलकुमार गित्ते यांची सामाजिक संवेदना ; पुणे येथे स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांना 25 मार्च पासून मोफत जेवण आजतागायत सुरू

विद्यार्थ्यांना गावाकडे जाण्यासाठी केली तीन बसमधून गावाकडे रवाना

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच संकटात विविध भागातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या विद्यार्थी पुणे येथे अडकलेले होते. त्यांच्या दोन वेळेचे मोफत जेवणाची व्यवस्था करून अनिलकुमार गित्ते यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा आधार दिला आहे. तसेच त्या विद्यार्थी आपल्या गावी जाण्यासाठी खाजगी तीन बसची व्यवस्था करून स्वारगेट ते बीड येथील विद्यार्थीना गावाकडे जाण्यासाठी रवाना केले आहेत. त्यामुळे विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त करत अनिलकुमार गित्ते यांचे आभार मानले आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.परळीचे भूमिपुत्र अनिलकुमार गित्ते यांची सामाजिक संवेदनाचे समाजातून कौतुक होत आहे.
कोरोना महामारीमुळे मागील दोन महिन्यापासून संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा चिताजनक परिस्थितीत पुणे येथे अडकलेल्या राज्यभरातुन आलेल्या स्पर्धा परीक्षेचा तयारी करण्यासाठी आलेल्या व इतर विद्यार्थ्यांसाठी सामाजिक संघटना, नाथ प्रतिष्ठान व हाँटेल मराठवाडा वतीने दोन वेळेचे जेवन मोफत वाटप करण्यात येत आहे. हा सामाजिक उपक्रम गेल्या दोन महिन्यापासून न खंड पडू देता परळी तालुक्यातील बेलंबा येथील भूमिपूत्र यशस्वीपणे राबवित आहेत. हा उपक्रम राबवित असतांना गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी परळी व बीड जिल्हा येथे जाण्यासाठी तीन खाजगी बसची व्यवस्था करून दिली आहे. तसेच या आगोदर ही त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके व मास्क, सेनिटरायर मोफत वाटप करून माणुसकी जागवली आहे.
लॉकडाऊन काळात येथे अडकलेल्या स्पर्धा परीक्षाच्या तयारी करण्यासाठी आलेल्या पुणे येथे स्वारगेट ते बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनासाठी आज आरोग्य तपासणी , सोशल डिस्टन्स, मास्क ,सेनिटरायर व जेवणाची बिसलरी व्यवस्था करून एसटी गाड्यांमधून रवाना करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वत खर्चाने करून अनिलकुमार गित्ते व यांनी तीन खाजगी ट्रव्हल्स करून त्यांच्या गावी रवाना करण्यात आले आहे.गावी जाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी समाधान व्यक्त करत अनिलकुमार गित्ते यांचे आभार मानले.
पुण्यामध्ये जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अडकलेले विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली. अश्यावेळी त्यांनी उपाशी राहू नये म्हणून अनिलकुमार गित्ते यांनी समाजाला आपले काही देणे लागत या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या दोन वेळेसच्या जेवणाची व्यवस्था करून देऊन मदतीचा हात पुढे केला. तसेच स्वतः खर्च करून तीन बसची व्यवस्था करून अडकलेल्या विद्यार्थ्यांना गावाकडे रवाना केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

पुणे येथे 25 मार्च पासून सुरू केलेला हा उपक्रम आजतागायत सुरळीतपणे सुरू आहे. यासाठी सचिन ढवळे सर, गजानन ठोकळे, सहदेव घुगे हे सर्वजण परीश्रम घेत आहेत. या उपक्रमास स्वेच्छेने अनेक बांधवांनी आर्थिक मदत केली. तसेच अनेक बांधवांनी अन्नधान्य व भाजीपाला स्वरूपात मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम गेल्या 48 दिवसापासून अखंडितपणे चालू आहे. तसेच हा उपक्रम लॉकडाउन व संचारबंदी संपेपर्यंत चालूच ठेवण्याचा निर्धार अनिलकुमार गित्ते यांनी सांगितले. हा उपक्रम राबविल्यामुळे अनिलकुमार गित्ते यांनी दाखवलेल्या सामाजिक संवेदनाचे समाजातून कौतुक होत आहे.

पिंपरी चिंचवड: औंध रुग्णालयात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांची गर्दी ; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

पिंपळे गुरव:आठवडा विशेष टीम― औंध रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांनी गर्दी करून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडवल्याचे दिसून येते. औंध जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याच ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरात असणाऱ्या जिल्ह्यातील व परराज्यातील नागरिकांना परगावी जाण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जवळ असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कोरोना जनजागृति साठी मोहीम राबवत आहेत, घरी थांबा असे आवाहन करण्यात येत आहे. मागील एक ते दीड महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन पाळलेल्या नागरिकांवर या गर्दीमुळे अन्याय तर होणार नाही ना असा संभ्रम निर्माण होत आहे.

लॉकडाऊनच्या काळात बाहेर गावी अडकलेल्यांना आपल्या गावी जाण्यासाठी व बाहेरून आपल्या लोकांना परत आणण्यासाठी उपविभागीय कार्यालयातून प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या प्रमाणपत्रांसाठी वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्याकरिता परगावी जाण्यासाठी नागरिकांनी औंध जिल्हा रुग्णालयात कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन न करता तसेच फिजिकल डिस्टन्सिंग न पाळता मोठी गर्दी करण्यात आली होती. प्रशासन या गर्दीला आवर घालण्यास तोकडे पडत आहे. या ठिकाणी प्रशासनाने अधिक कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्याची आवश्यकता आहे.

नागरिक प्रशासकीय परवानगीसाठी प्रयत्न करीत आहेत. बाहेर गावी जाण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र मिळविणे गरजेचे आहे.

त्यामुळे सदर नागरिक प्रशासकीय परवानगीसाठी धडपड करीत आहेत. परंतु वायसीएम रुग्णालयात आणि नवीन भोसरी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याने वैद्यकीय प्रमाणपत्रा करिता नागरिकांनी या ठिकाणी गर्दी न करता सहकार्य करावेे असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. तसेच औंध जिल्हा रुग्णालयातही कोरोनाचे रुग्ण असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये. या ठिकाणी प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून आले.

#fruitizm पुण्यातील ‘फ्रुटीजम्’ घेणार आता शेतकऱ्यांचा भाजीपाला ; अन्नदात्याला संकटाच्या काळात मदतीचा हात

आठवडा विशेष टीम― अवघ्या काही दिवसातच सर्व जगाला आपल्या विळख्यात घेणाऱ्या कोरोनानं फक्त महामारीचं संकट आणलं नाही तर सर्व जग लॉकडाउन करून टाकलं. कालपर्यंत धावणारं जग आज एकाएकी ठप्प झालं. या सगळ्या परिस्थितीत भारतानं या कोरोनाला हरवायचं ठरवलं. प्रत्येक भारतीय नागरिकानी आपली सोशल डिस्टंसिंगची जवाबदारी ओळखली आणि घरात स्वतःला बंद करून घेतलं. म्हणूनच भारत आज बऱ्याच प्रमाणात कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालाय. पण याची झळ भारतात प्रत्येकाला बसली. अगदी सामान्य वाटणाऱ्या सेवासुद्धा मिळेनाश्या झाल्या. जीवनावश्यक वस्तूंची तूट निर्माण झाली. सर्वात मोठा फटका अन्नदात्या शेतकऱ्याला बसला. माल आहे पण विकणार कसा? एकीकडे शेती उत्पादनं, विशेषतः भाज्या फळे, गिर्हाईक नाही म्हणून वाया जात आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना या सर्व वस्तू मिळवण्यासाठी खटपट करावी लागत आहे.
ही सामाजिक नड ओळखून, पुण्यात यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या ‘फ्रुटीजम्’ fruitizm.com (पायसम फूड सर्विसेस प्रायवेट लिमिटेड ) कंपनीनं एक उपक्रम हाती घेतला आहे . हा उपक्रम अगदी सोपा, पण अत्यंत प्रभावी ठरत आहे. शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यायचा, म्हणजे त्यांचा माल वाया जाणार नाही व त्यांचे नुकसान होणार नाही आणि शहरात विविध ठिकाणी लोकांपर्यंत तो पोहोचवायचा. पायसम फूड सर्विसेस प्रायवेट लिमिटेड (‘फ्रुटीजम्’) कंपनी या पूर्वी फक्त फळे आणि आणि त्याच्या पासून तयार केलेली ज्युसेस यांचे घरपोच सुविधा देत होती. पण कोविड १९ मुळे जपावा लागणार सोशल डिस्टंसिंग लक्षात घेता कंपनीने भाजीपाला आणि किराणा मालहि घरपोच पोहचवण्याठी सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना रास्त दरात जीवनावश्यक वस्तू पोहोचवणे शक्य झाले आहे. फ्रुटीजम् कंपनी याच क्षेत्रात पूर्वी पासून कार्यरत असल्यामुळे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचे सर्व आवश्यक उपाय येथे केले जातात. कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते.
कंपनी चे संचालक श्री. दिप भोंग यांनी शेतकरी बांधव तसेच गृह उद्योजक व महिला याना आवाहन केले आहे शिवाय त्यांनी कंपनीचे भविष्यातील विस्ताराबाबत माहिती दिली सर्व शेतकरी बांधवाना कंपनी तर्फे आवाहन करण्यात आले आहे कि त्यांनी कंपनीशी संपर्क साधून त्यांनी त्यांचे कडे उपलब्ध असलेल्या फळे भाजीपाला या विषीयी नोंदणी करावी.
तसेच सर्व गृह उद्योजक व महिला उद्योजक कडून हि कंपनी त्यांनी बनवलेले खाद्यपदार्थ घेऊन ते भारतीय व भारता बाहेरील बाजारपेठे मध्ये उपलब्ध करणार आहे. त्यांना आपले खाद्यपदार्थ आता कंपनीद्वारे लोकांपर्यंत पोहोचवता येणार आहेत .त्यांना हि कंपनीशी संपर्क (७२१९११५८५८) साधून रजिस्टर होता येईल अशी माहिती देण्यात आली.
फ्रुटीजम्’ कंपनीने काही वर्षातच पुणे शहरात विस्तार केला आहे आणि मागणी व कंपनीची कार्यक्षमता बघता, आता देशांतर्गतच नव्हे तर देशाबाहेरही विस्तार करण्याचे कंपनीचे ध्येय आहे. सर्वांना बरोबर घेऊन मोठे होण्यास कंपनीने सदैव प्राधान्य दिले आहे. त्यामुळे देशात व देशाबाहेर केल्या जाणाऱ्या निर्यातीचा, बाजारपेठेत असलेल्या या मंदीच्या काळात सर्वांनाच फायदा होईल. देशाबाहेरील निर्यातीसाठी कंपनीने APEDA रेजिस्ट्रेशन व आवश्यक सर्व तरतुदी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणी शिवाय यशस्वी व फायदेशीर निर्यात होऊ शकेल.

पायसम फूड तर्फे पुणे ,मुंबई ,नागपूर ,नाशिक या शहरात फ्रॅंचाईजी देण्यात येणार असून त्या मार्फत लवकरात लवकर घरपोच सेवा देता यावी यासाठी कंपनी प्रयन्तशील आहे शिवाय कंपनी बंगलोर चेन्नई हैद्राबाद या शहरात लवकरच त्यांचे स्टोअर्स सुरु करणार आहे.
हा कंपनीचा उपक्रम फक्त नफ्यासाठी नसून सामाजिक जाणिवेतून उभा केला आहे. सर्वांनाच फायद्याचा आणि मदतीचा असल्यामुळे हा उपक्रम बहुउद्देशीय आहे. सरकारच्या COVID-19 विरोधी लढ्यात हा खारीचा वाटा आहे, आपल्या अन्नदात्याला संकटाच्या काळात मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आहे, महिला आणि गृह उद्योजकांना या लॉकडाउनच्या काळात विकासाची संधी आहे. सर्व जनतेला कोणत्याही खाद्यपदार्थाची नड भासू नये, अगदी भाजी व फळांपासून ते चविष्ठ लोणच्यांपर्यंत कोणतीही गरज लवकर आणि अतिशय काळजीने हाताळण्यात येणाऱ्या घरपोच सेवेने व्हावी असा हा उपक्रम आहे.
या उपक्रमाच्या अनुषंगाने आपण सर्व जण एकत्र येऊन, येणाऱ्या आर्थिक मंदीवर मात करू शकतो. हा उपक्रम देशात व देशाबाहेर यशस्वी करून त्याचा लाभ संपूर्ण भारताला करून देऊ शकतो. या उपक्रमासाठी आणि अशा अनेक नवीन उपक्रमांतून सर्वांचा विकास साधण्यासाठी फ्रुटीजम्’ कंपनी नेहमी तत्पर आणि प्रयत्नशील आहे असे कंपनीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

जळगाव: पाचोरा येथे सुरक्षीततेची उपाययोजना खबरदारी म्‍हणून ५० बेडचे Covid19 केअर सेंटर कार्यान्‍वीत

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― संपुर्ण राज्‍यात कोरोना विषाणूची साथ झपाटयाने पसरत असून तातडीची उपाययोजना म्‍हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, नगरपालिका, विघ्‍नहर्ता हॉस्‍पीटल, ग्रामीण रुग्‍णालय पाचोरा यांचेतर्फे संयुक्‍तीत रित्‍या पाचोरा शहरातील विघ्‍नहर्ता हॉस्‍पीटल अधिग्रहीत करुन येथे रुग्‍णांकरीता ५० बेडस् चे कोव्‍हीड १९ केअर सेंटर कार्यान्‍वीत करण्‍यात आलेले आहे. सुसज्‍ज अशा कोव्‍हीड १९ केअर सेंटरमध्‍ये प्रामुख्‍याने ५० … Read more

७ वर्षापासुन बापाचा मुलीवर अत्याचार

बारामती:आठवडा विशेष टीम― वासनेपुढे अंध झालेल्या नराधमानं बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणार कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बापाने पोटच्या मुलीवरच वारंवार बलात्कार केल्याची घटना बारामती शहरात ही घटना घडली. याप्रकरणी बापाविरुद्ध गुन्हा दाखल करत बारामती शहर पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित … Read more

खाकीवर्दीतल्या अंकुश मिसाळ यांनी पालात राहणाऱ्या गोरगरीब लोकांना मोफत मास्क , सॅनिटायझर आणि नाष्ट्याचे केले मोफत वाटप

पुणे:गणेश शेवाळे― खाकी वर्दीत असलेला दिलदार माणूस मंचर पोलिस स्टेशन मध्ये पोलिस खात्यामध्ये काम करत असलेले अंकुश मिसाळसाहेब यांनी आपल्या हद्दीमध्ये राहत असलेल्या गोरगरीब पालावर राहणाऱ्या नागरिकांना कोरोना विषय जनजागृती करून हा आजार किती भयंकर आहे याची माहिती सांगून कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारा पासून दूर राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे व काय करुनय याची माहिती … Read more

#Philippines महाराष्ट्रातील जवळपास 200+ MBBSचे विध्यार्थी अडकलेत फिलिपीन्स देशामध्ये ; लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्यांना मायदेशी परत आणावं !

पुणे:आठवडा विशेष टीम― एमबीबीएस (परदेशातील एमडी-डॉक्टर ऑफ मेडिसिन) या डिग्री कोर्स साठी फिलिपीन्स या देशातील दवावो,मनिला आणि सेबु या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यातील विध्यार्थी वैदयकीय शिक्षण घेत आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव संपुर्ण जगावर होत आहे.अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारचा उपचार निघालेला नाही.फिलिपीन्स मध्ये आजच्या डीओएच च्या माहितीनुसार 2633 पॉसिटीव्ह केसेस आहेत तर 107 जणांचा मृत्यू … Read more

जिल्हा परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा सरसकट लाभ मिळावा, शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवा

प्राथमिक शिक्षण संचालकांच्या दालनात राज्य समन्वय समितीच्या वतीने राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझर कर यांची मागणी. पुणे:आठवडा विशेष टीम― राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे येथे राज्य शिक्षणसंचालक यांचे पत्रानुसार पुणे येथील त्यांच्या दालनात शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी 38 शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समितीची … Read more

नगर रस्त्यावरील तीन उड्डाणपुलांचा/ ग्रेड सेपरेटर भूमिपूजन समारंभ 15 मार्च पूर्वी ; प्रकल्प डिझाइन आणि आराखड्याला मान्यता

माजी आमदार जगदीश मुळीक आणि नगरसेवक योगेश मुळीक यांची माहिती पुणे:आठवडा विशेष टीम―पुणे नगर रस्त्यावरील कल्याणी नगर, खराडी, विश्रांतवाडी या तीन ठिकाणच्या उड्डाणपुलाचा/ ग्रेडसेपरेटर या प्रकल्प आराखडा तयार झाला असून तो एस्टीमट समिती कडे पाठविण्यात आला आहे. 15 मार्च पूर्वी सर्व मान्यता घेऊन तिन्ही प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ करणार असल्याची माहिती माजी आमदार जगदीश मुळीक आणि … Read more

पुणे: पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या वतीने पाणी कपातीच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा

टँकरचे बील सोसायट्यांच्या माथी मारण्याऐवजी महापालिकेने भरावे―सचिन साठे पिंपरी चिं.दि.०२:आठवडा विशेष टीम― राज्यामध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या महाविकास आघाडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडवावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. टँकर लॉबीला पोसण्यासाठी आयुक्तांनी नागरिकांवर दिवसाआड पाणी कपात लादली आहे. ‘धरण घशाला, कोरड उशाला’ अशी शहरातील करदात्या नागरिकांची अवस्था झाली आहे. सत्ताधा-यांचे आयुक्तांवर … Read more