तहसिलदार गणेश जाधव एसीबीच्या जाळ्यात

निलंगा: निलंगा तालुक्यात अवैध वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तरी देखील त्यावर कारवाई करण्याऐवजी ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे तेच वाळु माफियांशी हातमिळवणी करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बिनबोभाट कुठलीही कारवाई न करता अवैध वाळू वाहतुकीला परवानगी हवी असेल तर तीन लाख दे, अशी मागणी करणाऱ्या व ती लाच स्वीकारणाऱ्या निलंगा येथील तहसिलदारास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

तीन ट्रकमधून वाळूची वाहतूक करण्यासाठी व कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी एका व्यक्तीकडे प्रति ट्रक तीस हजारांची मागणी तहसिलदार गणेश जाधव यांनी केली होती. त्यानूसार मागील तीन महिन्याचे एकूण एक लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर तडजोडी अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. तहसीलदार गणेश जाधव यांच्या घरासमोर स्वतः गणेश दिगंबरराव जाधव आणि खाजगी व्यक्ती रमेश गुंडेराव मोगरगे यांना ही रक्कम स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

तक्रारदाराकडून वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर या पुढे कारवाई न करण्यासाठी प्रती ट्रक ३० हजार या प्रमाणे दोन ट्रकचे ६० हजार महिना या प्रमाणे तीन महिन्याचे १ लाख ८० हजार रुपये तहसिलदार जाधव यानी मध्यस्थामार्फत मागितले होते. तडजोडीनंतर दीड लाखाची रक्कम एजंट रमेश मोगेरगे यांचे कडे देण्यास सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे आज रोजी रमेश मोगेरगे याने निलंगा येथे तहसीलदार जाधव यांच्या घरासमोरच लाचेची रक्कम दीड लाख रुपये पंचासमक्ष घेतली.

दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तात्काळ दोन्ही आरोपींना पकडले. या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नदीत अवैध वाळू उपशासाठी बोटींचा सर्रास वापर चालु आहे.

पाटोदा येथे नायब तहसिलदार पदी असता वेळी सेतु चालकांच्या गळ्यातील ताईत झाले होते गणेश जाधव.

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

ग्रामीण भागातील पदवीधरांत रमेश पोकळे आघाडीवर

बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा विभागात पदवीधर निवडणूकीचे मैदान रंगले आहे.यात मुख्य पक्षांचे नेते पक्षाने दिलेल्या जबाबदारीमुळे पक्षाच्या उमेदवारांचा बाहेरबाहेर प्रचार करताना दिसत आहेत.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या विचारांनी चालणारे रमेश पोकळे देखील पदवीधर निवडणूकित औरंगाबाद विभाग मतदारसंघात उभे आहेत त्यांना देखील युवकांची ,ग्रामीण पदविधरांची पसंती आहे.तसेच अनेक पदवीधर संघटनांचा त्यांना पाठिंबा असल्याने ,भाषणकौशल्य उत्तम ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष पद सांभाळण्याचा अनुभव इत्यादी गोष्टी त्यांना फायदेशीर ठरणार आहेत.

स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांचे समर्थक ,कार्यकर्त्यांमध्ये देखील रमेश पोकळे नावाची क्रेझ आहे.त्यामुळे निवडणूकित त्यांच स्थान महत्वाचं असणार आहे.

अहमदपूर दलित हल्ला प्रकरण: पोलिसांची भूमिका दुट्टपी , दलित अन्याय प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पोलिसांची तक्रार करणार – दयाल बहादुरे

अहमदनगर येथे दलित कुटुंबावर सवर्णांनी केला प्राणघातक हल्ला

चार जन अत्यावस्थ गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी आरोपीना अटक करण्याऐवजी उलट पीडित कुटुंबावरच कलम ३०७ चा खोटा गुन्हा केला दाखल – दयाल बहादूरे ,रिपाई

मुंबई दि.२:आठवडा विशेष टीम―
अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर तालुक्यात असणाऱ्या इमामपूर गावात राहणारे अमित बाळासाहेब साळवे हे दलित कुटुंब राहात असून रविवारी दि.३० ऑगस्ट रोजी गावातील सवर्ण कुटुंबाने प्राणघातक हल्ला करून बेदम मारहाण करण्यात आला आहे.त्यामुळे आरोपींच्या विरोधात एमआयडीसी अहमदनगर पोलीस स्टेशन मध्ये कलम ३०७,४४१,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ व ऍट्रॉसिटी कायदा ३(१)(r),३(१)(s),३(२)(v)-A नुसार दि.३०ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर दलित कुटुंबावर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपीना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अखिलेश कुमार सिंग यांचेकडे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे यांनी फोन करून केली आहे.
या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी आहे की,अमित बाळासाहेब साळवे वय २९ वर्ष हा एम एस डब्लू पर्यंत शिक्षण घेतलेला दलित तरुण आपल्या आई-वडील कुटुंबासोबत इमामपूर गावात राहात होता.त्याच्या कुटुंबाने १९९९ मध्ये गावालगत असलेली ६९ गुंठे शेतजमीन खरेदी केली होती.यांच्या शेतजमिनी ला लागून आबा काशीनाथ मोकाटे या मराठा समाजाच्या सवर्णांची शेत जमीन असल्यामुळे साळवे कुटुंबाला शेतात जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता देण्यास तयार नव्हता त्यामुळे वर्ष २०१० पासून दोन्ही कुटुंबात वाद होता. या विरुद्ध साळवे कुटुंब कोर्टात जावून रस्ता देण्याची ऑर्डर मिळवून आणली व रस्ता तयार केला असता दि.30 ऑगस्ट २०२० रोजी आबा काशीनाथ मोकाटे कुटुंबाने रस्त्यावर बाभळीचे मोठे लाकूड आणून ठेवले आणि रस्ता पूर्णपणे बळजबरीने बंद केला आणि साळवे कुटुंबाच्या शेतात ट्रॅक्टर चालवून पिकाची नासधूस केली याबाबत साळवे कुटुंबांनी जाब विचारला असता साळवे कुटुंबाला जातीवरून अश्लील शिवीगाळ करीत काठ्या ,
दांडके, व विळ्यानी प्राणघातक हल्ला चढवून बेदम मारहाण केली आहे.
या हल्ल्यामध्ये साळवे कुटुंबातील १)बाळासाहेब रामभाऊ साळवे वय ५५ वर्ष, २)विलास रामभाऊ साळवे वय ६५ वर्ष ३) प्रकाश विलास साळवे वय
३५ वर्ष, ४)अमित बाळासाहेब साळवे वय २९ वर्ष हे चौघे जन जखमी झाले असून बाळासाहेब साळवे व विलास साळवे यां वृद्ध व्यक्तींच्या डोक्याला मारहाणीच्या मोठ्या जखमा झाल्यामुळे हे दोघे अत्यावस्थ अवस्थेत अहमदनगरच्या क्रीशटल हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहेत.
एमआयडीसी अहमदनगर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी १)आबा काशीनाथ मोकाटे, २) अमर काशीनाथ मोकाटे, ३)आनंद काशीनाथ मोकाटे, ४)गोरख शिवाजी आवारे, ५)नवनाथ शिवाजी आवारे, ६) शोभा आबा मोकाटे, ७)अर्चना नवनाथ आवारे या सात आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा व ऍट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना पोलिसांकडून अद्यापही अटक करण्यात आलेली नाही या बाबत पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग व विभागीय पोलीस अधिकारी अजीत पाटील याना दयाल बहादुरे यांनी विचारले असता आरोपीनी सुद्धा स्वतःला पाटील हॉस्पिटल मध्ये भरती करून घेतले असून त्यांनी सुद्धा साळवे कुटुंबाच्या विरोधात तक्रार दिली असल्यामुळे पीडित दलित साळवे कुटुंबातील १)विलास रामभाऊ साळवे २)बाळासाहेब रामभाऊ साळवे ३)अमित बालसाहेब साळवे ४) मोजेस बाळासाहेब साळवे ५) प्रकाश विलास साळवे ६) प्रभाकर विलास साळवे ७) निर्मला विलास साळवे ८) सुनीता बाळासाहेब साळवे ९) पुष्पा प्रभाकर साळवे या नऊ पीडित व्यक्ती च्या विरुद्ध पोलिसांनी कलम ३०७ , १४३, १४७, १४८, १४९, १८८, ५०४, ५०६ इत्यादी कलमाखाली खोटा गुन्हा माझ्या परिवाराच्या विरोधात नोंदवण्यात आलेला आहे असे अमित साळवे या अन्यायग्रस्त पिडितांचे म्हणने आहे. आरोपीना अटक कधी करणार असे पोलिसांना विचारले असता आरोपीना आता अटक करता येत नाही हॉस्पिटल मधून सुट्टी झाल्यावर अटक करण्यात येईल असे सांगितले आहे.
आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे .आम्हालाच मारहाण करून आमच्याच विरोधात ३०७ चा खोटा गुन्हा पोलिसांनी आरोपींच्या दबावाखाली दाखल केला आहे.अशी तक्रार अमित साळवे यांनी रिपब्लिकन पक्षा कडे केली आहे .पोलीस सवर्ण आरोपीना हेतुपुरस्सर पणे पाठीशी घालत असल्यामुळे पीडित दलित कुटुंबावर अन्याय करण्यात येत आहे. पोलिसांच्या या दुट्टपी पणाच्या भूमिकेची तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात येणार असून साळवे कुटुंबावर झालेला अन्याय दूर करून न्याय मिळवून दिला जाईल असे दयाल बहादुरे यांनी सांगितले.

कोणताही आजार अंगावर न काढता तात्काळ उपचार करून घ्या―विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

आरोग्य यंत्रणा सुसज्ज, प्रशासकीय यंत्रणांतही समन्वय

औरंगाबाद दि.3:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा खंबीर आहे. एकमेकांच्या समन्वयातून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या आजाराचा जिल्ह्यातील फैलाव रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. परंतु नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करुन स्वयंशिस्तीव्दारे कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी पुढे यावे. शिवाय कोणत्याही स्वरुपाचा आजार अंगावर न काढता तत्काळ आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जनतेला केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात औरंगाबाद जिल्ह्यात महसूल, मनपा, पोलिस तसेच आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, अप्पर विभागीय आयुक्त डॉ.विजयकुमार फड, म्हाडाचे मुख्याधिकारी अण्णासाहेब शिंदे, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, औषध वैद्यक शास्त्रविभागाच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य आदींची उपस्थिती होती.

विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर म्हणाले, मराठवाड्यात कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मराठवाड्यातील इतर जिल्ह्याबरोबरच औरंगाबाद शहर, वाळूज परिसरावर माझे विशेष बारकाईने लक्ष असून सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्य करत आहेत. नागरिकांनी या कोरोना महामारीच्या परिसरात घाबरुन न जाता शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यावर भर द्यावा. प्रशासकीय यंत्रणा परस्पर समन्वयातून अधिक सक्षमपणे कार्य करत आहे. अनेक भागात प्रत्यक्ष जाऊन मी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोना आजार गंभीर असला तरी नागरिकांनी लक्षणे दिसताच तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात व मुबलक अशा आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. जवळपास तीन हजार रुग्णांचे संस्थात्मक अलगीकरण करता येईल, एवढी औरंगाबाद मनपाने तयारी केलेली आहे. कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व यंत्रणांना निर्देशित केलेले आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी कोविड योध्दे मोठ्याप्रमाणात आरोग्य सुविधा, उपचार उपलब्ध करुन देण्यावर भर देत आहेत. जिल्ह्यातील बरेचसे कोरोना रुग्ण बरे होऊन घरीदेखील परतलेले आहेत. मात्र, अजूनही काही लोक कोणत्याही प्रकारची खबरदारी घेत नसल्याने इतरांना त्याचा मोठ्याप्रमाणात धोका होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून इतरांना जागृत करण्यावर भर द्यायला हवा. मास्कचा वापर, शारीरिक अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे, गर्दी टाळणे आदी सवयी नागरिकांनी स्वयंशिस्तीने लावून घेणे आवश्यक असल्याचेही श्री. केंद्रेकर म्हणाले.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सुरुवातीलाच प्रशासकीय पातळीवर करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, अधिकारी, कर्मचारी यांची कामगिरी, विविध विभागातील असलेला समन्वय आदी बाबी सांगितल्या. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये, यासाठी सर्वच यंत्रणा समन्वयातून मोठ्याप्रमाणात कार्य करत आहेत. शिवाय आरोग्य यंत्रणांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देण्यावर प्रशासनाचा भर असून कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी प्रशासन घेत असल्याचे सांगितले. मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी देखील औरंगाबाद शहरात करण्यात आलेल्या सोयी सुविधा, नागरिकांचा सहभाग याबाबत माहिती दिली. तसेच महानगरपालिकेत 24 तास सुरु करण्यात आलेली वॉर रुम, शहरात मोठ्याप्रमाणात करण्यात येत असलेल्या चाचण्या याबाबत माहिती दिली. आगामी काळात या चाचण्या अधिक वाढविण्यात येतील. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु सद्यस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास ‘कर्फ्यू’ लावण्याशिवाय पर्याय ठरणार नसल्याचेही श्री. पांडेय म्हणाले.
पोलिस आयुक्त श्री. प्रसाद यांनीही शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी आपापल्या परिसरात स्वत: हून पुढाकार घेऊन लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
कोरोनाचा लढा लढताना करावा लागत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत उपस्थित अधिका-यांनीदेखील प्रातिनिधिक स्वरुपात प्रशासकीय कामकाजाबाबत यावेळी माध्यमांना माहिती दिली. यामध्ये उपायुक्त श्रीमती ठाकूर यांनी कोरोना महामारी आम्हा सर्वांसाठीच नवे अव्हान होते. दररोज कामकाजात नवनवीन आव्हाने येत राहिली. सर्वच क्षेत्रात कोरोना आजाराची भिती पसरली होती. महसूल यंत्रणेपासून सर्वच विभागात ते सर्व सामान्य माणसापर्यंत या आजाराची भिती होती. परंतु जिल्ह्यातील आरोग्य विभागाने पहिल्या दिवसापासून ते आजतागायत कठोर परिश्रमातून अनेक रुग्ण बरे केले आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांच्या मनातील भिती दूर झाली. तरीही माध्यमांनी ही सकारात्मक बाजू जनतेपुढे आणून जनतेतील भिती दूर करण्याचे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी केले.
अप्पर विभागीय आयुक्त डॉ. फड यांनीही त्यांना आलेल्या शंभर दिवसातील अनुभव सांगतांना नागरिकांनी सद्यकाळात अधिक सजग राहून स्वत:ची खबरदारी घ्यावी. मला काहीच होत नाही., अशा मानसिकतेत राहू नये. स्वत:ची काळजी घेतानाच इतरांची काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन डॉ. फड यांनी केले. तसेच अन्नधान्याची ज्या गरजू नागरिकांना आवश्यकता आहे, अशा नागरिकांना स्वयंसेवी संस्थेची मदत घेऊन आवश्यक अन्नधान्याच्या 15 हजार कीटचे वाटपही प्रशासनाने केले असल्याचे डॉ. फड म्हणाले. म्हाडाचे मुख्याधिकारी श्री. शिंदे यांनीही मनपाच्या MHMH ॲपची उपयुक्तता यावेळी सांगितली. तसेच शहरात एक लाखाहून अधिक व्यक्तींचा डेटा या ॲपच्या माध्यमातून अपलोड करण्यात आलेला आहे, असे सांगितले. तर श्रीमती सूत्रावे यांनी संजय नगर भागात फैलावलेला कोरोनाचा प्रसार येथील नागरिकांच्या सहकार्यातून व सहभागातून आटोक्यात आला असल्याचे सांगितले.
उपजिल्हाधिकारी श्रीमती मैत्रेवार यांनीही महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य यंत्रणा, विभागीय आयुक्त आणि माध्यमे यातील समन्वयाची जबाबदारी सांभाळताना आलेले अनुभव यावेळी सांगितले. टीमवर्क मधून मोठ्याप्रमाणात कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रशासकीय यंत्रणा यशस्वी झाल्याचे त्या म्हणाल्या.
आरोग्य यंत्रणा सक्षम: डॉ. येळीकर
औरंगाबादमध्ये मार्चच्या मध्यात कोरोना दाखल झाला. तेव्हापासून आतापर्यंत आरोग्य यंत्रणेतील कोविड योध्दे अथक परिश्रमातून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. घाटीमध्ये औषध वैद्यक विभागात 208 खाटांची तर सुपर स्पेशालिटी इमारतीत 248 खाटांची सुसज्ज अशा प्रमाणात सर्व सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. तसेच घाटीत लवकरच प्लाज्मा थेरपीही सुरु होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या. औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या डॉ. भट्टाचार्य यांनीही रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करावे असे आवाहन यावेळी केले.


जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची नवीन केस होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी―पालकमंत्री अमित देशमुख

लातूर, दि.२७:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात आज रोजी उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या 53 इतकी असून हे सर्व रुग्ण मुंबई-पुणे व बाहेरून प्रवास करून आलेले आहेत. लातूर जिल्ह्यात प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना प्रभावीपणे राबवल्या असून रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवलेली आहे. तरी पुढील काळात कोरोनाबाधित रुग्णाची नवीन केस होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
झूम मिटींग ॲप द्वारे पालकमंत्री अमित देशमुख यांनी covid-19 च्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीस झूमवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, लातूर महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आदि उपस्थित होते.
पालकमंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले की, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी करून जिल्हा प्रशासनाने कोरोना चा प्रसार आटोक्यात आणलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा प्रशासनाच्या सर्व टीमचे अभिनंदन आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेले 53 रुग्णांपैकी 95 टक्के रुग्णांची प्रकृती स्थिर आहे व इतर रुग्णावर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करून घरी सोडले जाईल. आपल्या जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97 ते 98 टक्के इतके आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुढील काळात एकही कोरोना पॉझिटिव्ह केस होणार नाही याबाबत प्रशासनाने अधिक जागरूक राहून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र व राज्य शासनाने एखाद्या भागात कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळल्यास त्या परिसरातील किती भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करावयाचा याबाबत प्रोटोकॉल प्रमाणे प्रशासनाने काम करावे व त्या झोन’मध्ये अत्यावश्यक सर्व सुविधा वेळेवर उपलब्ध होतील याबाबत दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली. जर कँटमेंट झोनची मर्यादा नसेल तर एखाद्या भागात एखादा रुग्ण आढळल्यास त्या भागात आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात परंतु तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करू नये अशी सूचना त्यांनी केली.
लॉक डाऊन मध्ये गंजगोलाई परिसरात वाहन पार्किंग बाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेले मनाई आदेश योग्य असून पुढील काळात यामध्ये सुलभता आणावी परंतु शिथिलता देऊ नये अशी सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी करून वाहनधारकांसाठी वाहन पार्किंगची व्यवस्था करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी पार्किंग बाबत चांगले पाऊल उचलले असून पुढील काळात महापालिका प्रशासनाने शासकीय जागेत पार्किंग स्लॉट तयार करण्याचे काम पूर्ण करावे, असेही त्यांनी सूचित केले.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या परिसरातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल हे पूर्णपणे सज्ज असून या हॉस्पिटलचा लवकरच शुभारंभ करण्याचे नियोजन प्रशासनाने करावे, अशी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली. तसेच जिल्ह्यातील शिव भोजन केंद्रामध्ये फिजिकल डिस्टनचे पालन होत आहे की नाही त्याबाबत प्रशासनाने खात्री करावी. कंटेंमेंट झोन मधील नागरिकांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गोळ्या प्रोटोकॉल प्रमाणे देता येत असतील तर द्याव्यात असेही त्यांनी सूचित केले.
टंचाईच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांनी टंचाईच्या उपाययोजना राबवण्याबाबत ची मागणी केल्यास त्याची प्रशासनाने तात्काळ पडताळणी करून त्या उपयोजना राबविण्यास मंजुरी देण्याचे निर्देश प्रशासनाला यापूर्वीच दिलेले होते, असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला आवश्यक असलेल्या ॲम्बुलन्स चा पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगून खाजगी डॉक्टरांकडे ही पीपीई किट व इतर साहित्य उपलब्ध असणे गरजेचे आहेत, याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लक्ष घालावे असेही त्यांनी सूचित केले. त्याप्रमाणेच फळ व भाजीपाला मार्केट च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने अमरावती पॅटर्न ची माहिती घेऊन तो आपल्या लातूर शहरात राबवणे शक्य आहे का याची पडताळणी करावी असेही त्यांनी सूचित केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे व महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनीही कोरोना व पाणीटंचाईच्या अनुषंगाने समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली.
प्रारंभी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा प्रशासनामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कशा पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत आहे याची सविस्तर माहिती दिली. सध्या जिल्ह्यात जे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत ते मुंबई पुणे व इतर भागातून आलेले व पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कातील असल्याचे त्यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यात औसा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यात आतापर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. तसेच जिल्ह्यात उपचार घेत असलेले कोरोना बाधित रुग्ण 53 असून 22 कंटेनमेंट झोन आहेत. या सर्व कंटेंटमेंट झोनमध्ये मध्ये शासन सूचनेनुसार व्हाट्सअप ग्रुप बनवलेले असून या ग्रुप मध्ये एका महिला अधिकाऱ्यांचाही समावेश केल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा प्रशासन पुढील काळात कोरोनाशी लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे व अधिष्ठता डॉ. ठाकूर यांनीही त्यांच्या स्तरावरून होत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या च्या कामाची माहिती दिली.

#CoronaVirus : आज बीड मधील ८ , लातूर ४ तर उस्मानाबाद मधील ६ जण ‘कोविड-१९’ पॉझिटिव्ह

लातूर:आठवडा विशेष टीम― विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 19 मे 2020 रोजी एकुण 182 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 16 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील आहे व दुसरी व्यक्ती लातूर तालुक्यातील बोरगाव येथील आहे दोघेही 3 दिवसापूर्वी मुंबई येथून प्रवास करून आलेले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला आहे.

उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 35 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असुन त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह व 34 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, चाकुर येथुन 6 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले हाते त्यापैकी सर्वच 6 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, जळकोट येथील 10 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले असुन त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून 8 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे.लातुर जिल्हयातील असे एकुण 67 स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 4 पॉझिटीव्ह असुन 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) व एका व्यक्तीचा स्वॅब Reject करण्यात आला आहे.

तसेच बीड जिल्हयातील 66 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 55 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत व 3 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले असल्यामुळे त्यांची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील 49 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 42 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 6 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे.
असे एकुण आज 182 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 18 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 158 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत 5 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत व एक व्यक्तीचा स्वॅब Reject केला आहे आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.

माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर धनराज गुट्टे यांचा पहिला राजीनामा

मुंबई:आठवडा विशेष टीम― भाजपने विधान परिषद निवडणुकीत माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक , भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष श्री धनराज गुट्टे यांनी त्यांच्या पक्षाच्या पदाचा पहिला राजीनामा देऊन पंकजाताई मुंडे यांना तिकीट नाकारल्याचा राग व्यक्त केला आहे . राज्यभरात अनेकजण राजीनामे देत आहेत पण पहिला नंबर लागला तो धनराज गुट्टे यांचाच…
श्री गुट्टे हे माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे विश्वासू सहकारी व कट्टर समर्थक म्हणून गेल्या 12 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत . श्रीमती मुंडे वर जर कुणी साधी टीका जरी केली तर गुट्टे महाराष्ट्र भर आंदोलन करून त्या व्यक्तीचा निषेध करतात. कट्टर समर्थक कसा असावा तर तो धनराज गुट्टे सारखा अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते . विधान परिषद तिकीट कापल्यानंतर पंकजा मुंडे साठी राजीनामे देणारे पाहिले मुंडे सैनिक ठरले आहेत धनराज गुट्टे .
त्याबद्दल सर्व मुंडे समर्थकाकडून त्यांचे कौतुक होत आहे . श्री गुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिले ‘ जगतोय ताई साठी मरणार ही ताई साठी’ ‘ असे त्यांनी सांगितले.

“गो कोरोना गो” नाटिकेद्वारे समाजप्रबोधन ; बीड आणि लातुरच्या प्रशासनाकडून दखल

अंबाजोगाई:रणजित डांगे― सध्या कोरोना या जागतिक महामारीने कळस गाठला आहे.दिवसेंदिवस मृतांचा व कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे.सरकार कडूनही अनेक पातळ्यांवर प्रयत्न चालू आहेत.अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत.पोलीस,डॉक्टर,पत्रकार आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना वाचवत आहेत.दरम्यान या संदर्भात मुला,मुलींनी ऑनलाईनवर एकत्रित येवून संवाद नाट्य हे जनजागृती करण्यासाठी प्रभावी साधन ठरत असून बीड आणि लातुर प्रशासनाने “गो … Read more

लातूर : जितसिंग जुन्नी ,सुरजितसिंग जुन्नी यांच्यातर्फे कुटुंबांना अन्नधान्य , किराणासामान वाटप

लातूर:आठवडा विशेष टीम― जगभरासह भारतात वाढत्या कोरोना च्या रुग्णाच्या आकड्याने भारत सरकार ने १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्याने अनेकांवर भूकमारीची वेळ आली अश्या बातम्याही व्हायरल झाल्या त्यासाठी सरकारने देखील स्वयंसेवी संस्था,सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत अन्नपुरवठा बऱ्याच ठिकाणी केला आहे.त्याचधर्तीवर पाऊल ठेऊन लातूर येथील जितसिंग जुन्नी ,सुरजितसिंग जुन्नी सह सहकाऱ्यांनी लातूर येथील सिकलकरी समजातील लोकांना … Read more

#Philippines महाराष्ट्रातील जवळपास 200+ MBBSचे विध्यार्थी अडकलेत फिलिपीन्स देशामध्ये ; लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्यांना मायदेशी परत आणावं !

पुणे:आठवडा विशेष टीम― एमबीबीएस (परदेशातील एमडी-डॉक्टर ऑफ मेडिसिन) या डिग्री कोर्स साठी फिलिपीन्स या देशातील दवावो,मनिला आणि सेबु या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यातील विध्यार्थी वैदयकीय शिक्षण घेत आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव संपुर्ण जगावर होत आहे.अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारचा उपचार निघालेला नाही.फिलिपीन्स मध्ये आजच्या डीओएच च्या माहितीनुसार 2633 पॉसिटीव्ह केसेस आहेत तर 107 जणांचा मृत्यू … Read more

पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी सामाजिक बांधिलकीतून १ महिन्याचा पगार दिला ‘कोरोना निधी’ साठी

लातूर:आठवडा विशेष टीम―औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पी एस आय अमोल गुंडे यांनी आपली प्रशासकीय सेवा सांभाळून सामाजिक बांधीलकी जपत आपण समाजाचे काही तरी देने लागत असून या कर्तव्या तून त्यांनी आपला एक महिन्याच्या पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये देणार असल्याचे जाहीर केले आहे तर पी एस आय म्हणून मी देश … Read more

महाराष्ट्र सरकारने कापसाला हमी भावासोबत दोन हजार रु.बोनस द्यावा – अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके,राजकिशोर मोदी यांची मागणी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― राज्यात 27 नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. सरकारने हमी भाव जाहीर केला असला तरी पुरेशा खरेदी केंद्राअभावी तो शेतकर्‍यांना मिळत नाही.यामुळे नाविलाजास्तव शेतकर्‍यांना त्यांचा उत्पादित कापूस हा अत्यंत कमी भावाने खाजगी व्यापार्‍यांना विकावा लागला आहे.ज्याप्रमाणे मध्यप्रदेश सरकारने हमीभावाच्या फरकाची रक्कम व गुजरात सरकारने हमी भावाला बोनस दिला त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने … Read more

औसा येथील पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल ; उदगीर तालूका मराठी पत्रकार संघाचे उपजिल्हाअधिकारी यांना निवेदन

उदगीर:आठवडा विशेष टीम― औसा येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत राठोड यांच्यावर पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक नरसिंग ठाकूर यांनी 324 ,452 भा द वि ने गुन्हा नोंदवून प्रशांत राठोड यांना दोन दिवस पोलिस स्टेशनमध्ये डांबून ठेवून त्यांचा अमानुषरीत्या छ्ळ करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे .या पोलीस अधिकारी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची योग्य ती … Read more

लातुरातील काँग्रेस कार्यकर्ता झाला स्वच्छतादूत ‘पुढील पिढीसाठी चागंली देण, माझा परिसर स्वच्छ ठेवेन’ ; सर्वांसाठी दिला प्रेरणादायी संदेश

लातूर:आठवडा विशेष टीम―गुरूवार दि. ३ ऑक्टोंबर या दिवसाचे वैशीष्टये म्हणजे काँग्रेसची जनसभा आणि प्रचार शुभारंभ कार्यक्रम संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सभास्थान व परीसरात कचरा झाला होता. यावेळी कॉग्रेस कार्यकर्त्यांनी स्वच्छतादूत होऊन पुर्ण परिसराची साफसफाई केली, तेथे पडलेला कचरा, पावसाने झालेला चिखल या सगळयांची साफसफाई केली. हा परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर केला. या … Read more