पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

बीड: ऑनलाईन मतदार नोंदणीचा गैरफायदा घेत बेलवाडीत अनेकांची नावे मतदान यादीत

बेलवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत झालेला प्रकार, लोक प्रतिनिधित्व कायदा नुसार गुन्हे दाखल असताना जिल्हा प्रशासनाकडुन, निवडणूक विभागाकडून पाठराखण, विभागीय चौकशी व कारवाईसाठी आयुक्तालयासमोर आंदोलन – डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील बेलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत बेकायदेशीर रित्या ऑनलाईन मतदार नोंदणीचा गैरफायदा घेऊन २७ मे २०१८च्या निवडणुकीत बोगस मतदारांचा समावेश उदाहरणार्थ ६ मयत, बेपत्ता व्यक्ती, ११अल्पवयीन शाळकरी मुलं,४ दुबार मतदान, पुणे येथील नोकरीवर असलेले सैनिक जवान, कोकणातील मतदान ड्युटीवर कार्यरत असलेले ग्रामसेवक, ७ लग्न होऊन सासरी गेलेल्या व तिथे नांव नोंदणी करून मतदान केलेल्या मुली, २३बाहेरील गावातील लोकांचे बोगस पद्धतीने केले मतदान आदी प्रकरणात दि, २०/१०/२०१८ रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फौ.अ.क्र.७३२/२०१८, कलम ४१६,४६५,४६८,४७३,सह १०९ भादवि प्रमाणे कलम १७,१८,३१ लोक कृत्य प्रतिनिधित्व कायदा (Represention of the people act 1950) प्रमाने सरपंच, सरपंच पती,व ईतर संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, याप्रकरणी जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयुक्त, जिल्हा परिषद प्रशासन यांना लेखी तक्रार करून सुद्धा कारवाई न केल्यामुळे संबधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी व ग्रामपंचायत बरखास्तीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलनाचा ईशारा डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिला आहे.
बीड तालुक्यातील बेलवाडी ग्रामपंचायत २७ मे २०१८ मध्ये निवडणुकीत बोगस मतदार खालिलप्रमाणे आहेत

६ मयत मतदारांची नावे समाविष्ट
———————————————
१) चव्हाण अंकुश किसन
अनुक्रमांक १३६
मृत्यू दिनांक २०/०२/२०१८
२) विश्वांभर रामभाऊ यादव
अनुक्रमांक ४०४
मृत्यू दिनांक १३/०२/२०१८
३) निवृत्ती बाबुराव कदम
अनुक्रमांक ३४६
मृत्यू दिनांक १९/०३/२०१७
४) अर्चना भिमराव चव्हाण
अनुक्रमांक ८६
मृत्यू दिनांक २३/०५/२०१८
५) काशीबाई रामा यादव
अनुक्रमांक ४०३
मृत्यू दिनांक १६/१०/२०१७
६) अर्जुन बाबुराव चव्हाण
अनुक्रमांक ७६
मृत्यू दिनांक १३/११/२०१७

पोलीस डायरीवरती बेपत्ता नोंद असलेला–
————————————————–

मस्कर भागवत उत्तम
अनुक्रमांक २५२

दोनदा मतदान केलेले ४ मतदार
————————————-
१) कदम हनुमंत नवनाथ
अनुक्रमांक २९३ & ५३२
२) यादव वर्षा रावण
अनुक्रमांक ५१७ & ५२८
३) कदम अशोक मोहन
अनुक्रमांक ४७९ & ५११
४) खिंडकर अवधूत अर्जुन
अनुक्रमांक ५१० & ५३१
या सर्वांनी दोनदा मतदान केलेले आहे

अल्पवयीन शाळेतील मुलांचे मतदान
—————————————
१) चि, दळवे विठ्ठल नामदेव
जन्मदिनांक २५/०५/२००३
२) चि, चव्हाण हरिभाऊ कल्याण
जन्मदिनांक १४/११/२००२
३) चि, चव्हाण राहुल भिमराव
जन्मदिनांक १०/०६/२००२
४) चि, यादव समाधान रमेश
जन्मदिनांक १८/०८/२००१
५) चि, थापडे सखाराम सुखदेव
जन्मदिनांक १७/०३/२००२
६) चि, चव्हाण ऋषिकेश अंकुश
जन्मदिनांक १९/०५/२००२
७) चि, मुळे जयवंता कारभारी
जन्मदिनांक १६/०६/२००२
८) चव्हाण पवन कारभारी
जन्मदिनांक ३०/०७/२००१
९) चव्हाण पुजा कल्याण
जन्मदिनांक १२/०३/२००१
१०) खिंडकर सुदाम लक्ष्मण
जन्मदिनांक २०/०६/२००१
११) खिंडकर मुक्ता भारत
जन्मदिनांक २०/०३/२०००

कोकणातील मतदान ड्युटीवरील ग्रामसेवकाचे मतदान
———————————————–

यादव भरत विठ्ठलराव
अनुक्रमांक ४७३ , हे ग्रामसेवक असुन कोकणात मतदान ड्युटीवर कार्यरत असताना बेलवाडी ग्रामपंचायत मध्ये परस्पर बोगस मतदान केलेले आहे

पुणे येथे सैन्यदलात नोकरीवर असताना मतदान
———————————————–

पडघन आनिल मारोती हे पुणे येथे सैन्यदलात नोकरीवर असताना त्यांच्या परस्पर त्यांच्यानावे बेलवाडी मध्ये बोगस मतदान केलेले आहे.

बाहेरील गावातील स्थायिक लोकांच्या नावाने बेलवाडीतील रहिवासी दाखवून बोगस मतदान केलेले
———————————————–

१) बागडे गजानन मच्छिंद्र :– ईस्लामपुर बीड
२) बन्सड बन्सी देवराव :- मौजवाडी
३) चव्हाण बाबुराव सुखदेव :- इमामपुर
४) चव्हाण भिमराव शंकर:- घाटसावळी
५) चव्हाण कल्याण सुखदेव:- इमामपुर
६) चव्हाण निलावती बाबुराव:- इमामपुर
७) चव्हाण रामभाऊ सूर्यभान:- घाटसावळी
८) चव्हाण रूक्मिण सूर्यभान:- घाटसावळी
९) चव्हाण सुखदेव किसन:- नाळवंडी तांडा
१०) चव्हाण कविता अंकुश:- नाळवंडी तांडा
११) चव्हाण लक्ष्मण सूर्यभान:- पिंपळगाव घाट
१२) दळवे प्रकाश दादाराव:- कोळवाडी
१३) इंगोले सीताबाई रामभाऊ:- पाडळी
१४) जाधव सुरेश बापुराव:- बांभुळखुटा
१५) कदम गणपती मारोती:- रत्नागिरी
१६) कदम केसरबाई गणपत:- शाहूनगर बीड
१७) कुटे अभिमान राम:- बोर्ड
१८) सातपुते अर्चना सतिश:- बाभूळवाडी
१९) थापाडे गंगासागर सुखदेव:- ढेकणमोह
२०) थापाडे सुखदेव राजाराम:-ढेकणमोह
२१) वाणी बाजीराव लक्ष्मण:- आंबेसावळी
२२) यादव ज्ञानदेव निवृत्ती:- वांगी
२३) यादव शहादेव तुकाराम:- वांगी

वरील प्रकरणी जिल्हाधिकारी बीड, राज्य निवडणूक आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद बीड, तहसीलदार बीड यांना लेखी तक्रार दाखल करण्यात येऊन सुद्धा अद्याप कारवाई न केल्यामुळे दि, २ नोव्हेंबर २०२० रोजी विभागीय आयुक्त कार्यालय समोर सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

बेलवाडी ‘मनरेगा अपहार’ प्रकरण ; सोशल मिडियावर डॉ गणेश ढवळेंची नाहक बदनामी करणाऱ्या पोस्ट ,पोलीस प्रशासनाच्या कारवाई कडे लक्ष

बेलवाडी ग्रामपंचायतमध्ये मनरेगा अंतर्गत कामात ६० लाखांचा अपहार, विभागीय आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार , सोशल मीडियावर बदनामी केली,पोलीस अधीक्षकांकडे तक्रार , अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – डॉ गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी सुरू करण्यात आली मात्र स्थानिक पुढारी यांनी वरिष्ठांच्या वरदहस्ताने शासकीय आधिकारी, कर्मचारी यांच्याशी संगनमताने बोगस मजुर दाखवून व बनावट दस्तऐवज तयार करुन लाखो रूपयांचा अपहार केल्यामुळे संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत मोक्का लावण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, रोहयो मंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त यांना केली असून संबंधित प्रकरणी कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ गणेश ढवळे यांनी सांगितले आहे.

कामाचे नाव वर्क कोड नंबर रक्कम
१)बांधबंदिस्ती १ते ३९ वर्क कोड नंबर १७६८४३, रक्कम २२ लाख ५७ हजार ९९८ रूपये
२) बांधबंदिस्ती ५५ ते १४० वर्क कोड नंबर १७६८४२, रक्कम २२ लाख, ४९ हजार, ७७३ रूपये
३) बांधबंदिस्ती नविन वर्क कोड नंबर १२३४८३७१०५, रक्कम ७ लाख रुपये ६७ हजार १४४ रूपये
४) वृक्षसंगोपन बेलवाडी कोड नंबर १२३४८३७१०५ रक्कम ३ लाख ३५ हजार ५५० रूपये
५) वृक्षसंगोपन वर्क कोड नंबर १२३४८३७१०६ रक्कम २ लाख ३९ हजार ९१५ रूपये
६) शोषखड्डे बेलवाडी वर्क कोड नंबर ४७३४११२३८/४७३४११२३९/४७३४११२४८ रक्कम २ लाख १९ हजार रुपये
७) जलसिंचन विहीर बेलवाडी, वर्क कोड नंबर ४७३४४६९७१ रक्कम १ लाख ८७ हजार रुपये, अशाप्रकारे एकुण ६० लाख ३७ हजार ३८० रुपयांचा अपहार बोगस मजुर व दस्तऐवज दाखवून संगनमताने शासनाची फसवणूक करण्यात आली असल्याचा डॉ गणेश ढवळे यांचा आरोप आहे.

बांधबंदिस्ती एकाच कामाचे एकाच आठवड्यात ४ मस्टर, एकही मजुर उपस्थित नसताना ३८७ बोगस मजुर दाखवले

बेलवाडी गावामध्ये गट क्रमांक १ ते ३९ व गट क्रमांक ५५ ते १४० अशी दोन बोगस कामे कागदोपत्री केल्याचे दाखवले आहे व दोन्ही कामावर दिनांक २६/०४/२०१९ ते ०१/०५/२०१९ या आठवड्यात गट क्रमांक १ते ३९ वरती एकाच कामावर ४ मस्टर काढलेले आहेत.
१) मस्टर क्रमांक २०९९-५० मजुर
२) मस्टर क्रमांक २१००-५० मजुर
३) मस्टर क्रमांक-२१०१-५० मजुर
४) मस्टर क्रमांक-२१०२-४३ मजुर या कालावधीत एकुण १९३ मजुर दाखवले आहेत.

२) बांधबंदिस्ती गट क्रमांक ५५ते १४० या कामावरती दि, २६/०४/२०१९ते ०१/०५/२०१९ या कालावधीत एकाच कामावर ४ मस्टर काढलेले आहेत
१) मस्टर क्रमांक २०९२-५० मजुर
२) मस्टर क्रमांक-२०९३-५० मजुर
३) मस्टर क्रमांक-२०९४-५० मजुर
४) मस्टर क्रमांक-२०९५- ४४ मजुर असे एकूण १९४ मजुर दाखवले असल्याचा डॉ ढवळे यांचा आरोप आहे.
एकाच कामावर व एकाच आठवड्यात ४ मस्टर कसे काय काढले? प्रत्यक्षात एकही मजुर उपस्थित नसताना या आठवड्यात एकुण ३८७ बोगस मजुर दाखवून लाखो रुपये हडप केले आहेत.

२० वर्षापुर्वीची जलसिंचन विहीर नविन खोदल्याचे दाखवून अपहार
२० वर्षापुर्वीची विहीर नविन जलसिंचन विहीर खोदल्याचे दाखवून १ लाख ८७ हजार रूपये निधीचा अपहार करण्यात आला आहे.

मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी – डॉ.गणेश ढवळे

संबंधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन अपहारीत रक्कम शासन दरबारी जमा करण्यात यावी, बोगस मजुरांची नावे यादीत असून बंदिस्त जागेत वैयक्तिक रित्या रोहयो मजुरांचे जवाब नोंदवावेत म्हणजे खाते कोणी उघडले, मजुरांच्या नावावरील पैसे कोणी परस्पर उचलले याचा उलगडा होऊल, याप्रकरणात स्थानिक सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, आणि पंचायत समिती मधिल गटविकास आधिकारी, विस्तार आधिकारी, इंजिनिअर, एपीओ, डाटा एंट्री ऑपरेटर यांनी संगनमताने अपहार केल्यामुळे संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी

सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांची डॉ गणेश ढवळे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार तसेच अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

बेलवाडी नरेगाच्या कामातील अपहार प्रकरणात कारवाई करण्यासाठी डॉ गणेश ढवळे यांनी लेखी तक्रार केल्यामुळे सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी सरपंचपती व त्यांच्या सहकाऱ्यां विरोधात पोलीस अधीक्षक यांना लेखी तक्रार केली असून अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत.

बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांची व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी

लिंबागणेश दि.१८:आठवडा विशेष टीम

अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रूग्णालय बीड हे 20 वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रीय सहभागी असून स्व.विमलताई मुंदडा आरोग्यमंत्री असताना ते विशेष अधिकारी म्हणून त्यांचे काम पाहत होते. त्यादरम्यान त्यांनी आरोग्य विभागातील कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केली होती. त्यानंतर त्यांनी ना.पंकजाताई मुंडे, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड यांच्या कार्यकाळात केज उप रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक कार्यकारी पदी असताना शासनाची फसवणूक करून मुख्य सचिव यांना त्यांच्यावरील अवैध गर्भपात प्रकरणी उच्च न्यायलय व सर्वोच्च न्यायालयात आरोप कायम केलेले आहेत, हि गोष्ट लपवून पंकजाताई मुंडे यांची दिशाभुल करून बीड जिल्हा शल्यचिकित्सक पद मिळवलेले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी पोलीस उपअधिक्षक ,लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा बीड यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय, औरंगाबाद यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

तसेच तत्कालीन विरोधी पक्षनेते असताना व आजचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड ना.धनंजय मुंडे यांनी दि.27/02/2019 रोजी मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना पुराव्यानिशी लेखी तक्रार करताना डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रूग्णालय बीड हे राजकारणात सक्रीय, अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी, फौजदारी खटला, त्यांना अटक झाली असून त्यांच्यावर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये आरोप कायम स्वरूप प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तसेच शासकीय पदावर असताना केज तालुक्यातील तांबवा जि.प.गटातून निवडणूक लढवलेली होती. तसेच सत्ताधारी पक्षाचे शासकीय सेवेत असताना सक्रीय काम करत असून त्यांची तात्काळ जिल्ह्याबाहेर बदली करण्यात येवून त्यांच्यावर प्रशासकीय व फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार धनंजय मुंडे यांनी देखील केली होती.

बीड जिल्हा आरोग्य विभागाला मिळालेल्या 33 कोटी रूपयांच्या खरेदी व गुंतवणूक प्रकरणी मोठ्या प्रमाणावर अपहार झाला असून याप्रकरणी प्रमुख संशयित डॉ.अशोक थोरात असून त्यांनी या निधीचा स्वतः वर कार्यवाही होवू नये तसेच उपसंचालक पद मिळावे यासाठी गैर-व्यवहार करण्यात आल्याचा आरोग्य विभागातील तज्ञांचा संशय असून संबंधीत प्रकरणी डॉ.अशोक थोरात यांनी मोठ्या प्रमाणावर कमाई केली असून ती त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सुध्दा केल्याचा संशय असून याप्रकरणी डॉ.अशोक थोरात व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधीत दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच चौकशी न झाल्यास लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील सामाजिक कार्यकर्ते तथा किसान सभा बीड तालुकाध्यक्ष तथा दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे बीड तालुकाध्यक्ष तसेच दक्ष नागरिक जनकल्याण समिती बीड चे सदस्य असलेले डॉ.गणेश ढवळे यांनी दिला आहे.


कंत्राटदार मदन मस्के आणि कार्यकारी अभियंता बेदरे यांच्यावर ठाकरे सरकारच्या नविन धोरणानुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा – डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― कंत्राटदार मदन मस्के यांनी अंदाजपत्रकातील लिंबागणेश ते काटवटेवस्ती ते अंजनवतीते घारगांव रस्ता परस्पर वळवुन ढवळे वस्ती, वाणी वस्ती, नाईगडे वस्ती, घोलप वस्ती यांना रस्त्यापासून वंचित ठेवल्यानंतर करणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दि.३ सप्टेंबर २०२० वार गुरूवार रोजी सकाळी १० वाजता लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अंजनवती सरपंच सुनिल येडे यांचे ठेकेदार मदन मस्के आणि अभियंता जोगदंड यांच्याशी चर्चेनंतर घुमजाव

अंजनवतीचे सरपंच सुनील येडे यांनी दि. २६ जानेवारी २०२०रोजी घेतलेल्या सर्वसाधारण ग्रामसभेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत राज्यमार्ग-५६-लिंबागणेश-काटवटेवस्ती-अंजनवती-घारगांव हा टेंडर प्रमाणे रस्ता असुन रस्त्याच्या पुर्वेस काटवटेवस्ती दर्शविली आहे, मात्र सध्या चालू रस्त्तेकामात पश्चिम बाजूस आहे. त्यामुळे काम बंद पाडले आहे. सुचक काटवटे राजेंद्र व अनुमोदक काटवटे कैलास आहेत. त्यांनी दि. २६/०१/२०२० रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे,आ.संदिप क्षीरसागर, जिल्हाधिकारी बीड, कार्यकारी अभियंता (सीएमजीएसवाय) यांना निवेदन दिले आहे. दि. १२ मार्च २०२० रोजी लिंबागणेश येथे डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.यावेळी सरपंच सुनिल येडे आंदोलनात सामिल होते, मात्र नंतर ठेकेदार मदन मस्के आणि अभियंता जोगदंड यांच्याशी सल्ला-मसलत केल्यानंतर त्यांची भुमिका बदलली असुन रस्ता वळवला काय एवढेच नव्हे तर जुने पुल तसेच ठेवुन रस्ता काम सुरू आहे, याविषयी त्यांची काहीही तक्रार नाही.

लिंबागणेश सरपंच,उपसरपंचाची लेखी तक्रार, टेंडरप्रमाणेच रस्ता करावा–

दि.२८/०७/२०२० रोजी कार्यकारी अभियंता वाघ तसेच यांना दिलेल्या लेखी तक्रार मध्ये सरपंच आणि उपसरपंच यांनी लिंबागणेश बसस्थानक ते गणपती मंदिर व परिसरातील राज्यमार्ग ५६ लिंबागणेश ते काटवटे वस्ती ते अंजनवती ते घारगांव रस्ता मुळ अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात यावा असे लेखी निवेदन दिले आहे.सदरील रस्ता मुळ अंदाजपत्रकाप्रमाणे सिमेंट रस्ता आहे, त्यामध्ये कोणताही बदल होऊ नये, सदरील रस्त्यावर भालचंद्र गणपती मंदिर तिर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी येणा-या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून सदरील रस्त्याचे काम दर्जेदार व मुळ अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री यांनी नविन जाहीर धोरणाप्रमाणे निकृष्ट दर्जाचे रस्ताकाम प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा ठेकेदार आणि अभियंता ग्रा.र.वि.सं.बीड यांच्यावर दाखल करण्यात यावा–डॉ गणेश ढवळे

– मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या बीड- वरवटी-भाळवणी-बेलेश्वर रस्ता निकृष्ट दर्जाचा केल्याप्रकरणी तसेच लिंबागणेश ते काटवटेवस्ती ते अंजनवतीते घारगांव रस्ता परस्पर वळवुन ढवळे वस्ती, वाणी वस्ती, नाईगडे वस्ती, घोलप वस्ती यांना रस्त्यापासून वंचित ठेवल्यानंतर करणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाई. लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

बीड: ग्रामविकास मंत्रालयाने दिलेला ७१ लाखचा निधी रस्ता न करताच हडपल्याचा डॉ ढवळेंचा आरोप ; मुंख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल

भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या ठेकेदार बंधुचा प्रताप -ग्रामविकास मंत्रालयाने दिलेला ७१ लाख रू निधी रस्ता न करताच हडपला, मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांना तक्रार – डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील इजिमा ११३ ते धुमाळवाडी रस्ता सुधारणा करणे या कामाची एकुण लांबी १.७५० किलोमीटर, कामाची अंदाजित रक्कम ७१.२५ लक्ष रुपये. काम सुरू केल्याचा दि.०७/०३/२०१९ आणि काम पुर्णत्वाचा दि.०२/१२/२०१९ असे फलक या मार्गावर लावलेले आहेत,प्रत्यक्षात मात्र रस्ता न करताच निधी उचलून हडप केला आहे, यामुळे ठेकेदार मदन मस्के व कार्यकारी अभियंता बेदरे यांनी ग्रामस्थांसह ग्रामविकास मंत्रालयाची फसवणूक केली असल्याची भावना धुमाळवाडी करांनी बोलून दाखवली, या प्रकरणी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, अधिक्षक अभियंता,ग्रामिण रस्ते विकास संस्था विभागीय कार्यालय औरंगाबाद यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत निवेदन दिले आहे.

कार्यकारी अभियंता बेदरे आणि ठेकेदार मस्के यांची संगनमताने शासकीय तिजोरुवर दरोडा

ठेकेदार मदन मस्के यांनी भाळवणी ते बेलेश्वर या १३ कोटी रुपयांच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाचा रस्ता करून माती केलीच आहे, शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार केला आहे, परंतु आता धुमाळवाडी या ठिकाणी रस्ता न करताच दि
०७/०३/२०१९ ला काम सुरू आणि दि. ०२/१२/२०१९ ला काम पूर्ण झाल्याचा फलक लाऊन शासकीय तिजोरीवर दरोडाच टाकला आहे.
हा अपहार कार्यकारी अभियंता बेदरे आणि ठेकेदार मदन मस्के यांनी संगनमताने शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. यासाठी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना लेखी तक्रार केली आहे.

बीड: कोविड-१९ लढ्यात रुग्णालयातील खरेदीसाठी खर्चीत १५ कोटींची व रुग्णांची हेळसांड – डॉ गणेश ढवळे

अनागोंदी कारभार प्रकरणाची चौकशी स्वतंत्र कमिटी गठीत करून करण्याची मागणी

लिंबागणेश/बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी व रोग निवारणासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जात आहेत. केवळ बीड जिल्हा शासकीय रूग्णालय व स्वाराती अंतर्गत इतर ठिकाणी रूग्णांच्या उपचारासाठी रूग्णालयाच्या परिसरात 30 कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करण्यासाठी दिला आहे.विशेष म्हणजे औषधी खरेदी,कोरोना प्रादुर्भावावरील साहित्य, कोविड रूग्णालय सुरू करणे, वैद्यकीय साहित्य,साधन,यंत्र सामुग्री त्याचबरोबर पॉझिटिव्ह रूग्णांना श्‍वास घेण्यासाठी ऑक्सीजन प्लँट व पाईपलाईन. त्याचबरोबर विद्युतीकरण व इतर गोष्टीसाठी अंदाजे 15 कोटीच्याजवळ खर्च केला आहे. मात्र एवढा खर्च होऊनही लाईट गेली, व्हेन्टीलेटर बंद पडले आणि तडफडून रूग्णाचा मृत्यू झाला.यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर दुपारी उठून जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांनी पत्रकबाजी केली.एवढेच नव्हे तर जिल्हा रूग्णालयात काय खरेदी केली,काय सुविधा पुरविल्या हे उघडपणे सांगण्यात डॉ.अशोक थोरात कमी का पडत आहेत. त्यामुळे जिल्हा रूग्णालयात कोट्यावधी रूपयांचा खर्च कशावर झाला? केवळ कागदोपत्री दाखविल्या का? या सर्व गोष्टीची माहिती घेण्यासाठी व चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वैद्यकीय कमिटी स्थापन करून जिल्हा रूग्णालयाची पाहणी करून खर्च झालेल्या ठिकाणची पाहणी करावी अशी मागणी करत असताना राजकीय पुढार्‍यांनाही आवाहन केले आहे की पुढार्‍यांनो कोरोनाबाधित रूग्णांच्या संवेदना ओळखा डॉ.अशोक थोरातांना पाठीशी घालू नका अशी भावनात्मक हाक जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी दिली आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णावर उपचारासाठी अथवा या आजारावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन,लोकप्रतिनिधी व शासनाकडून करोडो रूपयांचा निधी देण्यात आला. हा निधी कशावर किती खर्च झाला याची माहिती पाहिली तर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जणू काही जिल्हा रूग्णालय बांधल्यापासून विद्युतीकरण झाले नाही असे भासवून विद्युतीकरणावर 52 लाख 81 हजार रूपये, ऑक्सीजन प्लँट,पाईनलाईन 5 कोटी 18 लाख 47 हजार रूपये,कोरोना वार्डातील अधिकारी,कर्मचारी निवारणीसाठी इमारतीचे विद्युतीकरण 3 लाख 19 हजार,प्रयोगशाळेची सुधारणा 28 लाख,जिल्हा शासकीय रूग्णालयातील अनेक वार्डचे कोविड कक्षात रूपांतरावर लाखो रूपयांचा खर्च केला आहे.त्यामुळे एकंदरीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरातांनी चालवलेला हा सावळा गोंधळ आणि रूग्णांची हेळसांड झालेली पाहता सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी चौकशीची मागणी केली आहे.कोट्यावधी रूपये खर्च करून पॉझिटिव्ह रूग्णांची हेळसांड होतेय कशी? विद्युतीकरणावर लाखो रूपये खर्च करून लाईट जाते कशी? रूग्णाचा तडफडून मृत्यू होतो कसा? ही जिल्ह्यासाठी आणि डॉ.अशोक थोरातांना पाठीशी घालणार्‍या राजकीय पुढार्‍यासह इतर जणांना रूग्णांची हेळसांड, रूग्णांचा मृत्यू यांच्या संवेदना दिसून येत नाहीत का? त्यामुळे अशोक थोरातांनी कोरोना संदर्भात जो खर्च दाखविला आहे त्या सर्व खर्चाची विभागीय आयुक्त मा.सुनिल केंद्रेकर यांनी चौकशी करावी आणि ज्या ठिकाणी ऑक्सीजन प्लँट,पाईपलाईन, विद्युतीकरण यासह ज्या ठिकाणी खर्च दाखविला आहे त्याची चौकशी,तपासणी करण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणाहून एक कमिटी पाठवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी मा.सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्तांना मा.राहुलजी रेखावार, जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केलेल्या ईमेलद्वारे केली आहे.

पाटोदा: वाघिरा व थेरला येथील हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती निधीतील अपहार प्रकरणी चौकशी करून कारवाई करा – डॉ ढवळे

पाटोदा दि.२४:नानासाहेब डिडुळ पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा आणि मौजे थेरला येथिल हुतात्मा स्मारकांच्या दुरूस्ती निधीतील अपहार प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांनी दिले आहे.

दि. २३/०७/२०२० सकाळी १० वा हुतात्मा बाबुराव धोंडीबा राख यांच्या हुतात्मा स्मारकास भेट

हुतात्मा स्मारकाचा उपयोग दारूडे आणि जुगारी राजरोसपणे करतायेत त्यांचे सर्वप्रथम आभार ,ते देत अलेल्या योगदानाबद्दल दरमहा पगार त्यांना शासनाने द्यायला हवी,कारण ते नसते तर हुतात्मा स्मारके खंडहर झाली असती. त्यांना शासनाने मोफत दारु आणि पत्याचे नवेकोरे पुरवणे बंधनकारक करावे.

मराठवाडा मुक्ती संग्रामदिन, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला ग्रामपंचायतीला स्मारकाची आठवण

शासकीय नियमानुसार हुतात्मा स्मारकाची नियमित रोज देखभाल म्हणजेच साफसफाई ग्रामपंचायतीच्या कर्मचा-याने करणे बंधनकारक आहे, कर्तव्य म्हणून नाही तर पगारी सेवक म्हणून तरी परंतु ग्रांमपंचायत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, १ मे महाराष्ट्र दिन ,१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी जाग येते आणि फुलांच्या माळा आणि भक्तिगीते लाऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा सोपस्कार पार पाडला जातो.

हुतात्मा स्मारक दुरूस्ती कामातील भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी लेखी तक्रार –डॉ.गणेश ढवळे

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मौजे वाघीरा आणि मौजे थेरला येथिल मराठवाडा मुक्ती संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मारक दुरुस्तीसाठी पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा आणि मौजे थेरला स्मारकांच्या दुरूस्तीसाठी प्रत्येकी १० लाख रुपये निधी वितरित करण्यात आला होता. परंतु ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने थातूरमातूर काम करून निधी हडप केला आहे,त्याची चौकशी करण्यात यावी ईस्टीमेटप्रमाणे काम केलेले आहे कि नाही याची खात्री करण्यात यावी याविषयी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.

पाटोदा नगरपंचायतचे मुख्याधिकारी शशिकांत भोसले यांना लाच घेताना अटक

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व त्यांच्या गाडी चालकास 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी ने रंगेहात पकडले ही मोठी कारवाई आज दिनांक 20 जुलै 2020 रोजी रात्री 7 च्या दरम्यान करण्यात आले याची प्राथमिक माहिती आहे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार असे समजते की तक्रारदाराचे नगर पालिकेच्या स्वच्छता विभागातील बील काढण्यासाठी पाटोदा नगर पालिकेचे मुख्याधिकारी शशिकांत भोसले यांनी लाचेची मागणी केली होती आज मुख्याधिकारी व चालक प्रदीप वाघ यांना 60 हजारांची लाच स्विकरताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले सदरील कारवाई लाचलुचपत विभागाचे अधिकारी हंनपुडे पाटील व त्यांच्या टीमने केली आहे केली आहे.

पाटोदा तालुक्यातील चुंबळी फाटा ते सौताडा पर्यतचे खड्डे बुजवन्याच्या संभाजी ब्रिगेडची मागणी

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील वांजरा फाटा पुलावरील संरक्षक पाईप नसल्याने वाहतुकीस घोका निर्माण झाला असुन वाहन धारकांच्या जिवास जिवित हानी व जनावरे देखील नदीत पडु शकतात. त्यामुळे संरक्षक पाईप बसवुन नागरिकांची सोय करावी. व चुंबळी फाटा ते सौताडा रस्त्यावरील खड्यामुळ वाहनधारकांना अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने खडे बुजवण्यात यावेत ८ दिवसात हा प्रश्न मार्गी लावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड पाटोदा यांच्या वतीने लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल व सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील या मागणीचे निवेदन तालुका अध्यक्ष रामदास भाकरे संभाजी बिग्रेड यांनी दिले आहे.

बोगस बियाणे दोषींवर कठोर शिक्षा होण्यासाठी कायद्यात सुधारणा करुन शिक्षा १ लाख रू दंड व ५ वर्षे कारावास करण्यात यावी– डॉ ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― बोगस बियाणे दोषींवर १९६६ सालच्या सीड अक्ट तरतुदीनुसार केवळ पहिल्यांदा ५०० रु दंड आणि दुसऱ्यांदा गून्हा केल्यास ५०० ते १००० रू दंड आणि ६ महिने ते १ वर्ष कारावासाची शिक्षा आहे, परंतु कायद्यातील तरतुदी नुसार त्याला अटक करता येत नाही कारण ३ वर्षांपर्यंत शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यात अटक करता येत नाही अशी तरतूद असल्यामुळे गुन्हेगारांवर वचक नाही त्यासाठी १९६६ सालच्या सीड अक्ट मधील बोगस बियाणे विक्री शिक्षेतील तरतुदीनुसार त्यातील दंडाची रक्कम १लाख रुपये व शिक्षा ५ वर्षांपर्यंत करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, कृषिमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बोगस बियाणे खरेदी करुन मोठी फसवणूक झाली असुन दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे,यास जबाबदार बोगस बियाणे विक्री करणारे मुख्य आरोपी आहेत. सन २९६६ साली सीड अक्ट अमलात आला.त्याला THE SEED ACT 1966 असे संबोधले जाते. या अक्ट तरतुदीनुसार दोषींना शिक्षा १) जर असा गुन्हा करताना डीलर सापडला आणि तो त्याचा पहिलाच गुन्हा असेल तर त्यास केवळ ५०० रु दंड आहे. २) दुसऱ्या वेळी असा गुन्हा सापडला तर ६ महिने ते १ वर्ष शिक्षा आणि ५०० ते १००० रू दंड आहे.
तसेच SEED (CONTROL) ORDER 1983, आवश्यक वस्तुंच्या कायद्यांतर्गत केंद्र शासनाने काढलेल्या आदेशानुसार डीलरच्या दुकानात विक्रीसाठी त्याचेकडे आस्तित्वात असलेल्या बियाणांची यादी आणि त्यांची किंमत स्पष्ट लिहीलेली असावी.सदरील आदेशानुसार सीड ईन्सपेक्टर चौकशीत दोषी आढळल्यास त्याचे लायसन्स रद्द करू शकतो. केवळ ५०० रु दंड भरून हे चोर लगेचच सुटतात. आणि पुन्हा जर गुन्हा केला तर केवळ ६ महिने ते १ वर्ष शिक्षा आहे. कायद्यांमध्ये ३ वर्षांपर्यंत शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यात अटक करता येत नाही, अशी तरतुद आहे. त्यामुळे या गुन्ह्यांना ५ वर्षांपर्यंत शिक्षा करावी, तसेच १ लाख रुपये पर्यंत दंड आणि कायम स्वरुपी परवाना रद्द करण्याची तरतूद करण्यात यावी. कायद्यात अशी सुधारणा केल्यास गुन्हा करणारास तात्काळ अटक होईल. व गुन्हेगारांवर जरब बसेल. यासाठी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, कृषिमंत्री, ग्रामविकास मंत्री , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.


बीड: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आ.आजबेंची पाटोदा मध्ये आढावा बैठक संपन्न ,नागरिकांनी केल्या विविध मागण्या

नगरपंचायतने गितेवाडी येथे केलेल्या बोगस रस्त्यांच्या कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी―चांगदेव गिते

गोरगरीब लोकांना येणारे राशन खाणार्यावर कारवाई करुन पाटोदा पुरवठा विभागातील सावळा गोंधळ थांबवा मुन्ना अन्सार यांची आमदार साहेबाकडे मागणी

पाटोदा:गणेश शेवाळे― तालुक्यात रखडलेली विविध विभागातील विकास कामे तात्काळ मार्गी लावावीत असे आदेश आ.बाळासाहेब आजबे यांनी येथील तहसिल कार्यालयात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले या प्रसंगी आ.आजबे यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सुचनाही दिल्या आ.बाळासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली पाटोदा येथील तहसिल कार्यालयात वीज वितरण , महसुल विभाग , शिक्षण , आरोग्य , जलसंधारण यासह प्रलंबित
असलेल्या विविध प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक झाली . प्रत्येक विभागातील रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावावीत अशा सुचना आ.आजबे यांनी यावेळी दिल्या यावेळी गोरगरीब लोकांना येणारे राशन खाणार्यावर कारवाई करुन पाटोदा पुरवठा विभागातील सावळा गोंधळ थांबवा मुन्ना अन्सार यांची आमदार साहेबाकडे मागणी केली तरपाटोदा नगरपंचायतने गितेवाडी येते केलेल्या बोगस रस्त्यांच्या कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी चांगदेव गिते यांनी केली यानंतर आमदार बाळासाहेब आजबे यांनी तहसिलदार यांना तात्काळ चौकशी करा व दोषी आढळल्यास कारवाई करा अशा सूचना केल्या या बैठकीत तहसिलदार रमेश मुडलोड , पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने , गटविकास अधिकारी मिसाळ , वनविभागाच्या श्रीमती पठाण , सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम डोंगरे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.

पोलिसाने पोलिसांकडूनच घेतली ३५ हजाराची लाच; पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

अदखलपात्र गुन्ह्यांपासून वाचविण्यासाठी केली लाचेची मागणी

गोंदिया दि.१९:बिंबिसार शहारे हल्ली कोणाचा कोणावरच विश्वास राहिलेला नाही,सामान्य जनतेला अधिकारी-कर्मचारी जुमानत नाही,सामान्य जनतेकडून चिरीमिरी घेणे हा प्रकार नीत्याचाच होत आहे मात्र ज्यांच्यावर जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे असे अधिकारी आपल्याच कर्मचाऱ्याकडून लाच घेताना मागेपुढे बघत नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेची किती पिळवणूक होत असेल हे या प्रकरणावरून आता समोर आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन येथे एका पोलीस कर्मचाऱ्यावर अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा नोंद आहे त्या गुन्ह्यांचा तपास आरोपी प्रदीप मधू अतुलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक व सह आरोपी उमेश ज्योतिराम गुटाळ पोलीस उपनिरीक्षक यांनी तक्रारदारावर नोंद असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यातून वाचवून बाल अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्यापासून बचाव करण्यासाठी तक्रारदार आकडे पस्तीस हजाराची मागणी केली त्याबदल्यात बाल अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ न देण्याचा व समझोता करून निपटारा करण्याच्या आमिषाने लाचेची मागणी केली मात्र तक्रारदाराला देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंध विभागाला सर्व परिस्थिती सांगितले त्यावरून 19 जून 2020 रोजी पोलीस स्टेशन ग्रामीण गोंदिया येथे सापळा रचून कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान मुख्य आरोपी प्रदीप मधु अतुलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी स्वतः लाचेची रक्कम स्वीकारली त्यामुळे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. सदरची कामगिरी रश्मी नांदेडकर पोलीस अधीक्षक राजेश दुलार अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनात रमाकांत कोकाटे, पोलीस उपअधीक्षक शिवशंकर जुमडे विजय खोबरागडे, पोलीस हवालदार प्रदीप तोरसकर, राजेश शेंद्रे रंजीत दिशेन, दिगंबर जाधव ई. केली

जळगाव: जिल्हा परिषदेतील लेखा अधिकाऱ्यास १३ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

नाशिक लाचलुचपत विभागाची कारवाई : बिल पास करण्यासाठी ठेकेदाराला मागितली लाच

जळगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत सिंचन विभागातील सहाय्यक लेखाधिकारी सुरेंद्रकुमार आहिरे (रा. जळगाव) या अधिकाऱ्याला 13 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जि.प. आवारात सापळा रचून ही कारवाई केली.
जिल्हा परिषदमधील सिंचन विभागातील लेखाधिकारी सुरेंद्रकुमार आहिरे याने ठेकेदाराचे बिल पास करण्यासाठी १५ हजाराची मागणी केली होती तक्रारदार ठेकेदाराने याबाबत नाशिक येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
सोमवारपासुन एसीबीच्या पथकाचा सापळा
तक्रारीची पडताळणी झाल्यावर
नाशिक विभागाचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कळासने, पो.नि. चंद्रकांत फालक, पो.ना. श्री. सपकाळे, प्रविण महाजन, पी.एच. पगारे या पथकाने सोमवारपासून जिल्हा परिषदेच्याचआवारात सापळा रचलेला होता. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ठेकेदाकडून तडजोडीअंती ठरलेली 13 हजाराची लाच घेतांना सुरेंद्रकुमार अाहिरे यांना पथकाने रंगेहाथ अटक केली आहे कोरोना अन् त्यातच लॉकडाऊन यादरम्यान जिल्हा परिषदेत झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे.

पाटोदा न्यायमंदिरासमोरील रस्ता चिखलात तर ठेकेदार डोंगरे भ्रष्टाचारात बरबटले, अपहार प्रकरणी मूख्यमंत्रयांकडे लेखी तक्रार―डॉ.गणेश ढवळे

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील पाटोदा ते ढाळेवाडी या ६ कि.मी. रस्ता अंदाजे किंमत ३ कोटी २२ लाख रुपये काम पूर्ण न करताच निधी उचलून काम पुर्णत्वाचा दि.२३/०८/२०१९ रोजी असा फलक पी.व्हि.पी.कालेज समोर लावला आहे.
ढाळेवाडी,आरणगाव ग्रामस्थांना बाजारहाट तसेच मुलांना शाळेसाठी पाटोदा येथे जावे लागत असल्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ ठेकेदाराने करावे अशी मागणी केली आहे.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड:

मुख्यमंत्री ग्राम सडक विकास संस्था बीड येथिल कार्यकारी अभियंता श्री बेंद्रे यांच्या आशिर्वादाने कनिष्ठ अभियंता जोगदंड व ठेकेदार डोंगरे यांनी संगनमताने शासकीय निधीचा अपहार केला असुन केवळ पाटोदा शहरातील अर्धा कि.मी.सिमेंट रस्ता केला आहे, पुढे न्याय मंदिरासमोरील रस्ता चिखलाने बरबटला असुन नागरीकांना रहदारीसाठी अडचण येत आहे. या अपहार प्रकरणी चौकशी करून शासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, रस्ते विकास मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५२ ,मांजरसुंबा ते नेकनुर निकृष्ट दर्जाचा, गवारी फाट्याजवळ काम अर्धवट सोडले,नागरीकांचे हाल ―डॉ ढवळे

मांजरसुंबा:आठवडा विशेष टीम― राष्ट्रीय महामार्ग ५२ सोलापूर ते धुळे मांजरसुंभा ते नेकनुर दरम्यान निकृष्ट दर्जाचे झाले असुन वर्षभरातच रस्त्याला तडे पडलें आहेत तर गवारी फाट्याजवळ रस्ताकाम अर्धवट सोडून दिले आहे. याप्रकरणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी तक्रार जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.

रस्ताकाम अर्धवट सोडल्यामुळे नागरीकांना मनस्ताप

मांजरसूंभा ते नेकनूर दरम्यान सिमेंट रस्ता काम दोन वर्षांपासून रखडलेले आहे, गवारी फाट्याजवळ काम अर्धवट सोडून दिलेले आहे, पावसाळ्यात खड्डयात पाणी साचत असुन खराब रस्त्यामुळे नागरीकांना वाहन दुरूस्तीचा खर्च वाढल्याचे तसेच जागोजागी असणा-या खड्ड्यांमुळे मणक्याचे व पाठीचे आजार वाढल्याचा दुचाकी वाहनधारकांची तक्रार आहे. तात्काळ रस्ता पुर्ण करण्यात यावा जेणेकरून नागरीकांचा प्रवास सुखकर व्हावा,मनस्ताप सहन करण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.

निकृष्ट दर्जाचे काम, नितिनजी गडकरी यांना लेखी तक्रार

मांजरसुंभा ते नेकनुर दरम्यान निकृष्ट दर्जाचे रस्ताकाम झाले असुन वर्षभरातच रस्त्याला भेगा पडल्या आहेत, याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे नितिनजी गडकरी ,केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांना केली आहे.